खबऱ्यांकडून टिप, पोलिसांकडून फ्रिजची तपासणी; 11 घरं बुलडोझरने पाडली; फ्रिजमध्ये काय सापडलं?

Madhya Pradesh News : मध्यप्रदेशातील मांडला येथे बेकायदेशीर गोमांस विक्रीच्या कारवाई दरम्यान आरोपींच्या बेकायदेशीर घरांवर प्रशासनाने फिरवला बुलडोझर. कारवाई झालेला भाग संपूर्णपणे अदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. पोलिसांना भैनवाही, नैनपूर या परिसरातील गायींना कत्तलीसाठी बंदिस्त करुन ठेवले अशी तक्रार मिळाली होती. घटनेची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली.

सुरुवातीला पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांना पोहचताच आरोपीच्या अंगणात १५० गायी बांधलेल्या आढळल्या. त्यानंतर पोलिसांनी परिसरात आणखी तपासाची चक्र फिरवली. त्यानंतर तब्बल ११ संशयितांच्या घरांची झडती घेतल्यावर, पोलिसांसमोर मोठे रॅकेट आले. पोलिसांना ११ जणांच्या घरात त्यांच्या फ्रीजमध्ये गायीचे मांस, प्राण्यांची चरबी, गुरांची कातडी आणि खोलीत साठवलेली हाडे सापडली असे सगळे आढळून आले. यानंतर सगळे मांस आणि इतर गोष्टी पोलिसांनी जप्त केले अशी माहिती पोलिस अधिक्षक रजत सकलेचा यांनी दिली आहे.
Dhule : बनावट मद्याचा कारखाना म्हणून टाकली धाड, पण मिळाले मोठे घबाड; कोट्यवधीचा माल जप्त

यानंतर पोलिसांनी सरकारी स्थानिक पशुवैद्यक यांच्याकडे मासांचे काही नमुने तपासासाठी पाठवले. पशुवैद्यकांच्या अहवालानुसार जप्त केलेले मांस गोमांस असल्याची पृष्ठी करण्यात आली. काही मासांचे डीएनए अधिक विश्लेषणासाठी पोलिसांनी हैदराबादला पाठवले आहेत. यासह कारवाईदरम्यान पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली ती म्हणजे गोमांस हत्येची माहिती मिळताच, पोलिसांनी कारवाई केली पण आढळलेल्या ११ आरोपींची घरे पूर्णपणे अनधिकृत होती. आणि सरकारी मालमत्ता असलेल्या जमिनीवर घरे उभारली होती त्यामुळे कारवाईदरम्यान पोलिसांनी ११ घरावर बुलडोझर फिरवला आणि त्यांना जमीनदोस्त केले असे एसपी म्हणाले आहेत.


गायी आणि गोमांस आढळल्यानंतर शुक्रवारी रात्री एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यासह एका संशायिताला अटक करण्यात आलीय तर इतर १० जणांना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. एसपी सकलेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कत्तलखान्यातून गायींना मोकळे करुन १५० गायी गोठ्यात पाठवण्यात आल्या आहेत. भैंसवाही परिसर गेल्या काही काळापासून गोहत्येच्या तस्करीचा केंद्र बनलाय असे सकलेचा म्हणाले. मध्य प्रदेशात गोहत्येसाठी आरोपींना सात वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

Source link

demolish 11 houseIllegal beefillegal beef sellingMadhya Pradeshpolicepolice rescue cow
Comments (0)
Add Comment