घटनास्थळापासून मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे निवासस्थान जवळ
मिळलेल्या माहितीनुसार, घटनास्थळापासून मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे निवासस्थान अगदी जवळ आहे. तसेच ज्या इमारतीला आग लागली ती इमारत कुकी जमातीच्या नागरी संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात असून ती गोव्याचे माजी मुख्य सचिव दिवंगत थांगखोपाओ किपगेन यांची असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने इमारतीत कोणीही राहत नसल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आगीने भीषण रुप धारण केले होते. आग विझवण्यासाठी थौबल जिल्ह्यातून अतिरिक्त अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर झाला होता हल्ला
एक वर्षाहून अधिक काळ हिंसाचाराचा सामना करत असलेल्या मणिपूरमध्ये वेळोवेळी हिंसक घटना घडत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. नुकताच (10 जून) रोजी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. कांगपोकपी जिल्ह्यात सशस्त्र अतिरेक्यांनी ताफ्याचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी आधी गेलेल्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला आहे. तर या घटनेच्या आधी दोन दिवस आधी (८ जून) रोजी जिरीबाम जिल्ह्यात सशस्त्र हल्लेखोरांच्या जमावाने दोन पोलीस चौक्यांना आग लावली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून वनविभागासह अनेक सरकारी कार्यालये आणि सुमारे ७० घरेही जाळण्यात आले होते.