Andhra Pradesh : पुलाला जिल्हाधिकाऱ्याचं नाव, पंचक्रोशीत अनोख्या घटनेची चर्चा; कारण काय?

AP Ias Himanshu Shukala : भारतात आज युपीएससीची परीक्षा पार पडली आहे आणि अनेक विद्यार्थी लोकसेवेचा ध्यास घेवून परीक्षेची तयारी करतात पण अशातच आजूबाजूला असणारे अनेक अधिकारी त्यांना लोकसेवेत उतरण्यासाठी आणखी प्रेरित करत असतात. विजयवाडा येथील अशाच आयएसएस अधिकारी हिमांशु शुक्ला यांची सुद्धा चांगलीच चर्चा रंगली आहे. लोकांप्रती असेलेली त्यांची अशीच एका कृती जनसामान्यांमध्ये एक आशेचा किरण बनली आहे. डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात आयएसएस हिमांशु शुक्ला जिल्हाधिकारी पदावर सध्या कार्यरत आहेत.

साधारण एक करोड इतक्या खर्चाच्या असणाऱ्या पुलाचे काम शुक्ला यांनी भष्ट्रचारमुक्त पद्धतीने केले, लोकांनी थेट मग शुक्ला यांना डोक्यावरच घेतले. लुटुकुरु आणि पसरलापुडी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम शुक्ला यांनी कोणत्या लाभाविना केले. ग्रामीण भागातील दळणवळण सेवा सुरळित करण्यासाठी शुक्ला यांनी पूर्ण मेहनत घेतली.

लोकांना शुक्ला यांनी उभारलेल्या पूलाचे अधिक कौतुक वाटले आणि त्यांनी चक्क ‘राम हिमांशु शुक्ला राम सेतू’ असेच पुलाला नाव दिले. मजेशीर म्हणजे याआधीसुद्धा ममीदीकुडरु आणि अप्पनपल्ली अश्या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाला लोकांनी ‘शुक्ला वर्दी’ असे नाव दिले होते.
रेल्वे पुलासाठी सांगलीकरांनी घातले श्राद्ध, अनोख्या आंदोलनाने सारेच चकित

डॉ.बी.आर आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात लुटुकुरु आणि पसरलापुडी गावांना जोडण्यासाठी हा पुल प्रामुख्याने उभारण्यात आला. पुलामुळे ममीदी कुडुरुची पशरलापुडी लंका ग्राम पंचायत आणि त्या अंतर्गत येणारे लुटुकुरु, कोमारदा, मकन्नापालम, अदुरु, मदकापल्ली आणि गोगन्नामथम या वाड्या वस्तींना जोडण्याचे काम पुलामुळे होते.

एक करोड एक लाख २० हजारांचा शुक्ला सेतू
पुलाचे नाव जिल्हा अधिकारी यांच्या नावावर ठेवण्यासाठी पासरलापुडी ग्राम पंचायतीत ठराव मांडण्यात आला आणि त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.जिल्हाअधिकाऱ्यांनी प्रयत्नांची केली पराकष्ठा आणि निधी मिळवण्यासाठी केलेली धडपड यांचे कौतुक सुद्धा ग्रामस्थांनी केले.साधारण पुल उभारण्यासाठी एक करोड एक लाख वीस हजार इतकी रक्कम खर्च करण्यात आली. खासदार निधीतून २५ लाख, जिल्हा परिषदेच्या निधीतून ३५ लाख आणि जिल्हा परिषदेकडून ४१.२० लाख असे पैसे उभारुन पुलाचे बांधकाम पार पडले आहे.

Source link

andhra pradeshbr ambedkar konsimadrhimanshu shukala ram setuias himanshu shukala
Comments (0)
Add Comment