उकाडा वाढला, दाम्पत्य एसी लावून झोपलं; काही वेळातच दोघांचा अंत, सगळ्यांना अलर्ट करणारी बातमी

Jaipur AC Blast : देशात उष्णतेचा प्रभाव असल्याने अनेकजण एसी सुरु ठेवूनच झोपणे किंवा दिवसभर एसी सुरु ठेवून राहणे पसंत करतात पण कधीतरी काही क्षणिक गारवा तुमच्या आयुष्याला पुर्णविराम लावू शकतो. अशीच एक दुर्देवी घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये शनिवारी घडली आहे. प्रवीण वर्मा आणि पत्नी रेणू यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे खोलीत एसी सुरु ठेवला आणि दोघेही गाढ झोपी गेले पण विचार न केलेली घटना घडली आणि झोपतेच दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रवीण वर्मा आणि त्यांची पत्नी रेणू दोघेही जयपूरमध्ये वास्तव्याला होते. प्रवीण यांचे वय ६५ वर्ष होते इंटिरियर डिझानयर म्हणून ते कार्यरत होते आणि त्यांच्या पत्नी रेणू ६० वर्षीय होत्या, रेणू या सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक होत्या. दोघांना एक मुलगा सुद्धा आहे जो सध्या थायलंडमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
डंपरची बाईकला जोरदार धडक, चाकाखाली आल्याने पोलीस कर्मचाऱ्यासह महिलेचा मृत्यू; दोघांच्या मृत्यूने हळहळ

पती प्रवीण आणि पत्नी रेणू दोघेही बेडरुममध्ये एसी लावून झोपले होते. पण अचानक एसीने पेट घेतला आणि काही कळण्याआधीच एसीच्या स्फोटाने आगीने तीव्र रुप धारण केले. काही कळण्याआधीच दोघांचाही आगीत गुदमुरुन मृत्यू झाला.

एसीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असे तपासात समोर आले. स्थानिकांनी जोडप्याला मदत करण्यापूर्वीच धुरामुळे दोघेही गुदमरले असे कळतंय. शेजाऱ्यांनी आग लागले असे कळताच अग्निशामक दलाला पाचरण केले. अग्निशमक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घराच्या खिडक्या तोडून बचावकार्य सुरु केले.

घरात प्रवेश केल्यानंतर अग्निशामक दलाला धुराचे मोठे लोट दिसले, पती प्रवीण आणि पत्नी रेणू दोघेही बेडजवळ बेशुद्ध पडलेले दिसले, अग्निशामक दलाने तातडीने रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. जोडप्याचा एकुलता एक मुलगा हर्षित वर्मा थायलंडमध्ये पत्नीसह वास्तव्याला आहे. पोलिसांनी मुलाला दुर्घटनेबद्दल माहिती दिली मुलगा भारतात परतल्यावर पोस्टमॉर्टम करण्यात येईल, त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल.

Source link

ac fireac fire newsac fire news in jaipurair conditionerjaipurrajasthan
Comments (0)
Add Comment