Xiaomi 6L Air Fryer भारतात लाँच; अनेक फीचर्ससह झटपट कुकिंग

Xiaomi ने भारतात आपले नवीन एअर फ्रायर लॉन्च केले आहे, जे 6 लिटर क्षमतेसह येते. यात अनेक प्री-सेट झटपट पाककृतींचा पर्याय देण्यात आला आहे, ज्यामुळे युजर्सना स्वयंपाक करण्यात मदत होईल. त्याची विक्री 21 जूनपासून सुरू आहे. कंपनीने हे एअर फ्रायर विशेष किंमतीसह लाँच केले आहे, ज्यावर सूट देखील उपलब्ध आहे.

Xiaomi Air Fryer 6L मध्ये काय आहे खास

  • Xiaomi Air Fryer 6L ची हीटिंग पॉवर 1500W आहे.
  • याचा वापर करून तुम्ही कमी वेळात अनेक गोष्टी शिजवू शकता.
  • यामध्ये तुम्हाला 40 डिग्री सेल्सिअस ते 200 डिग्री सेल्सिअस पर्यंत ॲडजस्टेबल तापमान मिळते.
  • कंपनीचे म्हणणे आहे की ते 24 तास सतत वापरता येते.
  • जेव्हा तापमान कमी होते, तेव्हा रोटेटिंग स्पीड आपोआप कमी होते.
  • युजर्स त्यांचा स्वयंपाक 24 तासांसाठी शेड्यूल करू शकतात. त्यात अनेक प्री-सेट क्विक रेसिपी पर्याय उपलब्ध आहेत.
  • यासह, यात शेक रिमाइंडर फंक्शन आहे, जे युजर्सना अन्न हलवून घेण्याची आठवण करून देते.
  • याच्या कॅपिसिटीलाही ॲडजस्ट करता येते. तुम्हाला 6 लीटर आणि 3 लीटरचे ॲडजस्टेबल कॅपिसिटीचे पर्याय मिळतात.
  • कुकिंग बास्केट बाहेर काढून ग्राहक कधीही फुड स्टेट्स तपासू शकतात.
  • याच्या फ्रायिंग बास्केटमध्ये ड्युअल लेयर पीटीएफई नॉन-स्टिक कोटिंग आहे

किंमत व उपलब्धता

कंपनीने Xiaomi Air Fryer 6L 6,999 रुपयांच्या विशेष किमतीत लाँच केला आहे. त्याची विक्री 21 जून रोजी होईल, जी तुम्ही Mi.com वरून खरेदी करू शकता. ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 1000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. ही लाँच ऑफर आहे. त्याचे वजन सुमारे 5 किलो आहे.

Source link

air fryerfast cookingXiaomiएअर फ्रायरझटपट कूकिंगशाओमी
Comments (0)
Add Comment