PUBG Craze: पबजी खेळता खेळता मैत्री; अमेरिकन तरुणी भारतात; बस थेट पोलीस ठाण्यात गेली अन् मग…

नवी दिल्ली : पब्जी खेळता खेळता मैत्री झाली आणि एक अमेरिकन तरुणी भारतात पोहोचली. तंत्रज्ञानाने तर जगभरातील लोकांशी संवाद साधणे तर सोपे केलेच आहे. पण आता तर मोबाईल गेमच्या नादाने विदेशी तरुणीला भारतात आणून सोडले आहे. पब्जी खेळता खेळता झालेल्या मित्राला भेटण्यासाठी ही तरुणी भारतात आली आणि इथे आल्यावर तिच्यासोबत अजब घटना घडली आहे.

पब्जी खेळता खेळता अमेरिकेतील तरुणीची भारतातील एका तरुणाशी चांगली मैत्री झाली. त्यांच्यातील संवाद वाढत गेला आणि त्यांनी एकमेकांना भेटायचं ठरवलं. त्यासाठी ती चंदीगड मधील पोहोचली आणि तिच्या मैत्रिणीकडे राहिली. यानंतर तिने दिल्ली गाठली आणि तिथे काम करणाऱ्या एका कारखान्यात काम करणाऱ्या तिच्या मित्राला भेटली. हिमांशु नामक या तरुणाबरोबर ती ५ मे ला इटावा येथे आली आणि त्याच्या घरीच राहिली.
Nashik Crime: गोणीत मानवी कवट्या अन् हाडे, अघोरी विद्येचा प्रकार? मांत्रिकाचा मृत्यू; नाशिकमध्ये खळबळ
यानंतर गुरुवारी रात्री विदेशी तरुणी ब्रुकलिन आणि तिचा मित्र हिमांशु इटावा आगारातून बसने दिल्लीला जाण्याच्या मार्गावर होते. यादरम्यान कोणीतरी इटावा प्रादेशिक व्यवस्थापक (आरएम) यांच्याकडे परदेशी मुलीला जबरदस्तीने पळवून नेत असल्याची तक्रार केली. व्यवस्थापनाच्या सांगण्यावरून चालकाने बस घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. येथे पोहोचताच पोलिसांनी दोहोंची कसून चौकशी केली.
Mumbai Crime: सतत मोबाईलवर असल्याने भावाला राग, जबर मारहाण करत बहिणीचे केस कापले; मुंबईत संतापजनक घटना
याप्रकरणी इटावा ग्रामीणचे एसपी रणविजय सिंह म्हणाले, ब्रुकलिन या तरुणीने स्वेच्छेने भारतात आल्याचे सांगितले आहे. स्वसंमतीनेच तिने हिमांशूसोबत दिल्लीमार्गे चंदीगडला जायचे ठरवले होते. हिमांशूवर कोणतीही कारवाई करु शकत नाही. या प्रकरणाची माहिती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.

Source link

american young girlfriendship while game playingpubgpubg friendshippubg game crazeपब्जी मोबाईल गेमपब्जीचा नादपब्जीची क्रेझपब्जीमुळे विदेशी तरुणीची ओळखमोबाईल गेम
Comments (0)
Add Comment