आयसीयुचे डॉक्टर मुस्तहासिन मलिक यांनी माहिती दिली की दोन्ही बहिणींचे वडील रुग्ण सुफी सैयद जुनैद साबरी वयवर्ष ५५ यांना छातीत संसर्ग झाला होता त्या कारणास्तव ८ जूनला नव वधूंच्या वडिलाना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दोन्ही मुलीचे लग्न २२ जूनला मुंबईत करण्याचे ठरले होते, पण वडिल नसल्याने लग्न खोळंबले होते. आता रुग्णालय प्रशासनाने अडचण लक्षात घेवून रुग्णालयात वडिलाच्या उपस्थित लग्न करण्याची परवानगी दिली. लग्नाला फक्त पाच जण उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. आयसीयुमध्ये लग्नासाठी खास सोय करण्यात आली.
पहिली मुलगी डॉ.द्रक्षा सय्यद हिचा विवाह गुरुवारी आणि दुसरी मुलगी तनझिला सय्यद तिचा विवाह शुक्रवारी पार पडला. रुग्ण जुनैद यांचे भाऊ डॉ तारीक सबरी म्हणाले गेल्या १४ महिन्यात पाच वेळा असेच जुनैद यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. यंदा लग्नात असा प्रसंग ओढवल्याने सारेच चिंतेत होते. अशावेळी रुग्ण जुनैद यांचे भाऊ तारीक सबरी यांनी प्रोफेसर डॉक्टर मुस्तहासिन यांना कल्पना दिली, त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडून लग्नाला परवानगी मिळवली, डीनकडून होकार मिळवला आणि दोन्ही बहिणींचे वेगवेगळ्या दिवशी पाच लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकले.
मुलींनी सुद्धा रुग्णालयाचे आभार मानलेत, आमचे वडीलच आमचे जग आहेत त्यामुळे त्यांचा उपस्थितिविना लग्न करणे म्हणजे शक्य नव्हते, नवआयुष्यात प्रवास करताना त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, त्यांच्या डोळ्यात आनंद दिसत होता असे मुलगी द्रक्षा म्हणाली.