Vastu Tips For broken gods idol and photos :
देवघरात मूर्ती ठेवून मूर्तींची पूजा करणे ही परंपरा आपल्या घरात जुन्या काळापासून चालत आलेली आहे. देवांची मनोभावे पूजा केल्यामुळे मनाला सुखशांती आणि समाधान मिळते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जेचा निवास असतो असे म्हणतात. दरम्यान मूर्ती संदर्भात एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी, घरात तुटलेल्या मूर्ती ठेवली तर वास्तूदोष लागतो, नकारात्मक ऊर्जा वाढते. तुमच्या घरात तुटलेली मूर्ती किंवा फोटो फ्रेम असेल तर त्याचे काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो त्यासाठी शास्त्रात काही उपाय सांगितलेले आहेत.
1. मूर्तींशी संबंधित या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तूनुसार जर घरात तुटलेल्या वस्तू ठेवल्या तर वास्तुदोष वाढतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा येते. जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी देवांच्या मूर्तींचे ध्यान करत असतो. त्यामुळे आपल्याला मानसिक समाधान मिळते आणि ताणतणाव काही प्रमाणात दूर होतो. पण विचार करा आपल्या डोळ्यासमोर एक खंडित मूर्ती आहे तर ध्यान करणे शक्य होईल का?
पूजा करताना आपले लक्ष सारखे सारखे त्या तुटलेल्या मूर्ती किंव फ्रेमकडे जाईल. मन भटकेल आणि एकाग्रतेअभावी विचारांची शुद्धी शक्य नाही म्हणून घरात एखादी मूर्ती किंवा फ्रेम तुटली असेल तर ती ताबडतोब काढून टाकावी.
2. दोन इंचापेक्षा मोठी मूर्ती नको
देवी देवतांच्या मूर्ती खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मूर्ती दोन इंचापेक्षा मोठी नसावी. आपण मूर्ती विकत घेताना ती मोठी घेतो कारण ती छान दिसते पण ती जुनी व्हायला लागली, त्याचा रंग उडू लागला की ती विद्रुप दिसू लागते. म्हणून आपण मूर्तीची निवड करताना जाणीवपूर्वक करावी, खास करून ती प्रदुषणमुक्त आहे की नाही आणि मूर्ती दीड ते दोन इंचापेक्षा मोठी नाही, हे पहावे.
3. खंडित मूर्तींचे वाहत्या पाण्यात करा विसर्जन
खंडित मूर्ती किंवा जुने फोटो वाहत्या पाण्यात मूर्ती सोडून देणे योग्य आहे. कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत या गोष्टी पुढे जातात. म्हणून साचलेल्या पाण्यात, डबक्यात अशा गोष्टी टाकू नये. अनेकजण पिंपळाच्या झाडाखाली किंवा बेवारस जागी खंडित मूर्ती किंवा फ्रेम ठेवतात हे अत्यंत चुकीचे आहे. देवाचा फोटो असणारी फ्रेम तुटली असेल तर फोटो काचेतून बाहेर काढून फोटोचे विसर्जन करावे.
4. पाण्यात विरघळून टाकणे
खंडित मातीची मूर्ती किंवा कागदाचे फाटलेले फोटो असतील तर बादतील पाणी घेवून त्यात
विरघळू द्या. ते पाणी तुम्ही झाडांसाठी वापरु शकता. हीच गोष्ट तुम्ही जुन्या पोथ्यांच्या बाबतीत करू शकता. मूर्ती आणि फोटो पाण्यात विरघळून जातात आणि ते पाणी मातीत मिसळून जाते.
5. मूर्ती जमिनीत पुरणे
- खंडित मूर्ती जमिनीत पुरल्यानंतर ती कालांतराने मातीशी एकरूप होते. मूर्ती मातीत पूरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मूर्ती मातीत पुरण्यापूर्वी त्यावर श्रद्धापूर्वक हळद कुंकू अक्षता
- वाहाव्यात. तसेच नवीन मूर्ती खरेदी करताना ती माती, दगड किंवा वाळू पासून बनवलेली असावी, म्हणजे त्या विसर्जीत करताना निसर्गासोबत पटकन एकरूप होतात.
- ज्या मूर्ती किंवा फोटो फ्रेमची आपण आदराने पूजा करतो, त्या खराब झाल्यावर सन्मानाने त्यांचे विसर्जन किंवा विघटन करा. म्हणजे तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही असे सांगितले जाते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.