एकाच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या चार जणांचा गेला जीव
दरम्यान, या टेम्पो ट्रॅव्हलरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी सहा जण एकाच फ्लॅटवर राहत होते. तसेच ते एकमेकांचे मित्र असून या अपघातात चार जणांचा जीव गेला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांचे वय 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर हे सर्वजण नोएडामधील वेगवेगळ्या फर्ममध्ये काम करत होते.
एकत्रित सुट्टी घेऊन फिरायला जायचे ठरवले होते
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हे सर्व मित्र नोएडाच्या सेक्टर 51 मध्ये एका अपार्टमेंटमध्ये एकत्र राहत होते. प्रत्येकाने कामातून सुट्टी घेत गढवालच्या डोंगरावर असलेल्या चोपटा तुंगनाथ मंदिरात जाण्याचा प्लॅन केला होता. मात्र दुर्दैवाने बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत निकिता भट्ट (वय २६), मोहिनी पांडे (वय २७), अंजली श्रीवास्तव (वय २७) आणि स्मृती शर्मा (वय २८) यांना जीव गमवावा लागला. तर शुभम सिंग (वय 27) आणि वंदना शर्मा (वय 30) हे जखमी झाले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, निकिता ही उत्तराखंडमधील उधम सिंह नगरची रहिवासी होती. ती नोएडा येथील सेक्टर 132 मध्ये एका कॉर्पोरेटमध्ये काम करत होती. स्मृती शर्मा सोनभद्र (उत्तर प्रदेश), मोहिनी पांडे प्रतापगड (उत्तर प्रदेश) आणि अंजली श्रीवास्तव बेतिया (बिहार) येथे राहत होत्या. तर जखमी झालेले शुभम सिंग कुशीनगर (यूपी) तर वंदना शर्मा प्रयागराज (यूपी) येथील आहेत.
दरम्यान, टेम्पो ट्रॅव्हलर रात्रभर प्रवास करत होता. त्यामुळे चालकाला झोप लागली त्यामुळे हा तो दरीत कोसळून अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली. या दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.