Samsung Galaxy F55 ची किंमत
Samsung Galaxy F55 ची भारतातील किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होते. ही फोनच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. फोनचा 8GB RAM व 256GB स्टोरेज मॉडेल 29,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर 12GB RAM व 256GB स्टोरेज असलेलया टॉप एन्ड मॉडेलची किंमत 32,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. फोन आज रात्री 7 वाजता फ्लिपकार्टवर अर्ली सेलसाठी उपलब्ध होईल. फोन ब्लॅक आणि ऑरेंज कलरमध्ये व्हीगन लेदर आणि सॅडल स्टिच पॅटर्नसह आला आहे.
Samsung Galaxy F55 मधील बदल
Galaxy F55 गेल्यावर्षी आलेल्या Galaxy F54 ची जागा घेईल. व्हीगन लेदर बॅक असलेला हा एफ सीरिजचा पहिला स्मार्टफोन आहे. कंपनीनं यात क्वॉलकॉमच्या Snapdragon 7 Gen 1 चिपसेटचा वापर केला आहे. तर 108MP च्या प्रायमरी कॅमेऱ्याची जागा 50MP च्या OIS सेन्सरने घेतली आहे. अल्ट्रा वाइड आणि मॅक्रो सेन्सर मात्र बदलला नाही. यातील सेल्फी कॅमेरा सेन्सर 50MP चा करण्यात आला आहे, जो आधीच्या मॉडेलमध्ये 32MP चा होता. कंपनीनं 6000mAh ची बॅटरी कमी करून 5000mAh ची केली आहे. तर चार्जिंग स्पीड वाढवून 45W करण्यात आला आहे.
Samsung Galaxy F55 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy F55 मध्ये 6.7 इंचाचा FHD+ सुपर अॅमोलेड+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन Snapdragon 7 Gen 1 चिपसेटसह बाजारात आला आहे, ज्यात 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज देण्यात आली आहे. सोबत कंपनीनं 5000mAh ची बॅटरी दिली आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोटोग्राफीसाठी Galaxy F55 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा OIS प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Android 14 आधारित वनयुआय 6.0 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात यूएसबी टाइप सी पोर्ट आणि एनएफसी इत्यादी ऑप्शन मिळतात तर सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.