पारोळा येथे बंद ला संमिश्र प्रतिसाद

पारोळा-प्रतिनिधी लखिमपुर घटनेच्या निषेधार्थ आज मविआ च्या वतीने महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते याला पारोळा शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला,याबाबत अधिक असे के उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथे शेतकर्यावर दुर्दैवी घटना घडली या घटने चा निषेध म्हणुन आज मविआ च्या वतीने महाराष्ट्र बंद चे आवाहन करण्यात आले होते, यावेळी पारोळा शहरात या बंद ला समिश्र प्रतिसाद मिळाला, यावेळी मविआ च्या वतीने या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्याना भावपुर्ण श्रध्दांजली वाहाण्यात आली नंतर सर्व पक्षीय नेत्यानी बाजार पेठतुन फिरून व्यापार्यांना बंद चे आवाहन केले,या आवाहनाला साथ देत शहरातील बाजार पेठेतील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवली दुपारून मात्र काही दुकाने उघडण्यात आली, यावेळी मा,पालक मंत्री डाॅ, सतिष पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ, हर्षल माने, पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अमोल पाटील, पारोळा काँग्रेस तालुका अध्यक्ष पिरन अनुष्ठान,मनोराज पाटील दौलत पाटील यांचा सह शिवसेना,राष्ट्रवादी,व काँग्रेस, तसेच सर्व पक्षाचे पधादिकारी कार्यकर्ते उपस्थित होते,

आजचं भविष्यउद्धव ठाकरेकरोनाकोल्हापूरनारायण राणेपुणेभाजपशिवसेना
Comments (0)
Add Comment