मुलं स्कूल बसनं जायची, कोणालाच संशय यायचा नाही; एक दिवस धाड पडली अन् भयंकर प्रकार उघडकीस

भोपाळ: मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील एका दारुच्या कारखान्यातून बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. राजधानी भोपाळपासून २५ किलोमीटर दूर असलेल्या सोम डिस्टलरीमध्ये बालकामगारांना १४-१४ तास राबवून घेण्यात होतं. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) आणि बचपन बचाव आयोगानं संयुक्तपणे कारवाई करत ५८ बालकामगारांची सुटका केली. त्यात ३९ मुलं आणि १९ मुलींचा समावेश आहे.

हानिकारक रसायनं आणि दारुमुळे लहान मुलांचे हात भाजले होते. या मुलांना दिवसाला केवळ २०० ते ४०० रुपये मजुरी देण्यात यायची. कोणालाही संशय येऊ नये म्हणून दररोज त्यांची वाहतूक शाळेच्या बसमधून केली जायची. त्यांच्यापासून दिवसाचे १४ तास काम करुन घेण्यात यायचं. जीव गुदमरुन जाईल अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात मुलं काम करायची. सोम डिस्टिलरीवर छापा टाकण्याची कारवाई एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.
स्लाईडवरुन येताना बेशुद्ध, काही मिनिटांत मृत्यू; वॉटर पार्कमध्ये बँक मॅनेजरसोबत काय घडलं?
दारुच्या कारखान्यात बालकामगार काम करत असल्याचा प्रकार अतिशय गंभीर असल्याचं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. संबंधित विभागाकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रायसेनचे प्रभारी जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी कन्हैयालाल अतुलकर, उपनिरीक्षक प्रीती उईके, शेफाली शर्मा आणि मुकेश श्रीवास्तव यांना निलंबित करण्यात आलं आहे.
थुकपट्टी! सलूनवाल्यावर ग्राहकाला संशय, CCTV फुटेज पाहिलं अन् किळसवाणा प्रकार उघडकीस
पोलिसांनी कारखान्याच्या संचालकावर गुन्हा दाखल केला. पण पोलीस आणि प्रशासन कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी केला. सुटका करण्यात मुलांना पोलिसांनी गायब केलं असून कंपनीवर जामीनपात्र कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. कारवाईत सुधारणा न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

Source link

child laborers rescuedcrime newsMadhya Pradeshmadhya pradesh distilleryक्राईम न्यूजबाल कामगारमध्य प्रदेश
Comments (0)
Add Comment