जर तुम्हाला स्मार्टफोन व्यतिरिक्त कीपॅडसह फोन खरेदी करण्याची गरज वाटत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तुम्ही मोटोरोलाचा ड्युअल सिम कीपॅड फोन 1200 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. फोनमध्ये ऑटो कॉल रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध आहे. चला या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊया.
Motorola A10Vचे फिचर्स
- व्हॉइस फिचर: हा मोटोरोला फोन व्हॉइस फिचरसह येतो.
- CPU: CPU मॉडेलबद्दल बोलायचे तर फोन MediaTek Helio सह येतो..
- ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी: Motorola A10V फोन ड्युअल सिम कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे.
- बॅटरी बॅकअप : फोन 7 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप असलेल्या 800mAh बॅटरीसह येतो.
- स्टोरेज : फोनमधील स्टोरेज 32GB पर्यंत वाढवता येते.
- वायरलेस एफएम: फोनमध्ये वायरलेस एफएम सुविधा देखील उपलब्ध आहे.
- कलर ऑप्शन: ग्राहक मोटोरोला फोन ब्लॅक आणि टील ब्लू या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात.
- ऑनलाइन उपलब्धता : तुम्ही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon वरून फोन खरेदी करू शकता .
- रिप्लेसमेंट वॉरंटी : कंपनी या Motorola फोनवर 2 वर्षांची रिप्लेसमेंट वॉरंटी देखील देत आहे. कंपनी सर्व Motorola Keypad मोबाईल फोनसाठी अशी वॉरंटी देण्याचे आश्वासन देते.
1200 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळेल हा फोन
तुम्ही Motorolaचा फोन खरेदी केल्यास तुम्हाला हँडसेटसोबत पॉवर अॅडॉप्टरही दिले जाते. फोनच्या वजनाबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिवाइस 82 ग्रॅम वजनासह येते. जर तुम्ही कमी किमतीत उत्कृष्ट कीपॅड फोन शोधत असाल, तर Motorola A10V तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. या फोनच्या विविध फिचर्ससह हा फोन तुमच्या दैनंदिन गरजांसाठी उत्तम ठरू शकतो.