विनोद तावडे ‘लक्ष्मण’रेषा ओलांडणार? भाजपचे बॉस होण्यात ‘साऊथ’चा अडथळा; ओबीसी नेता रेसमध्ये

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे पक्षाकडून नव्या अध्यक्षपदासाठी नेत्यांची चाचपणी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत मागास आणि इतर मागास वर्गातील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवली. संविधान बदलाच्या चर्चेचा फटका भाजपला बसला. त्यामुळे नवा अध्यक्ष याच समाजातील असू शकतो.

बंगारु लक्ष्मण यांची निवड करुन २४ वर्षांपूर्वी भाजपनं मागास व्यक्तीला अध्यक्षपद दिलं होतं. त्यानंतर मात्र मागासवर्गीय व्यक्तीकडे भाजपनं अध्यक्षपद सोपवलं नाही. त्यामुळे मागासवर्गीय समाजात योग्य राजकीय संदेश देण्यासाठी भाजप या समाज घटकातील नेत्याला संधी देऊ शकतो. भाजपच्या अध्यक्षपदासाठी विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा आहे. ते सध्या महासचिव पदावर कार्यरत आहेत.
Rahul Gandhi: वायनाडची सोडून साथ, राहुल गांधींनी का धरला रायबरेलीचा हात? काँग्रेसच्या खेळीमागे कारणं सात
लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांनी इंडिया आघाडी तयार केली. विरोधकांच्या एकीचा फटका बसू शकतो याचा अंदाज घेऊन तावडेंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एनडीएमध्ये आणलं. त्याचा फायदा भाजपला बिहारमध्ये झाला. विशेष म्हणजे नितीश कुमार यांचा जेडीयु लोकसभा निवडणूक निकालानंतर केंद्रात किंगमेकर ठरला. त्यांच्या १२ जागा निवडून आल्या. त्यामुळे तावडेंनी केलेली कामगिरी भाजपसाठी किती महत्त्वाची ठरली याची कल्पना करता येऊ शकते.
CM योगींना हटवण्याची तयारी ‘तेव्हाच’ झालेली! पुस्तकातील दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजप, शिवसेनेचं सरकार असताना विनोद तावडेंकडे शिक्षण मंत्रिपद होतं. २०१९ मध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आलं. पण तावडेंनी जराही खळबळ केली नाही. कोणतीही नाराजी व्यक्त न करता ते संघटनेत काम करत राहिले. बिहारची जबाबदारी त्यांनी उत्तमपणे सांभाळली. ते संघाच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक आहे.

भाजपच्या अध्यक्षपदासाठी राज्यसभा खासदार के. लक्ष्मण यांच्या नावाचीही चर्चा आहे. ते सध्या ओबीसी मोर्चाचे प्रमुख आहेत. लक्ष्मण मूळचे तेलंगणाचे आहेत. भाजप सध्या दक्षिणेत विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे लक्ष्मण यांच्या नावाचा विचार सुरु आहे. पण त्यांना संघाचा पाठिंबा आहे का, याबद्दल ठोस सांगता येत नाही.

Source link

bjpJ P Naddak laxmanvinod tawdeके. लक्ष्मणजे. पी. नड्डाभाजपविनोद तावडे
Comments (0)
Add Comment