shelar criticizes govt over bandh: ‘महाराष्ट्र बंद’; ‘जनता असाच सरकारला शासकीय इतमामात निरोप देईल’

हायलाइट्स:

  • ‘महाराष्ट्र बंद’वरून भाजप आमदार आशीष शेलार यांंची आघाडी सरकारवर टीका.
  • पोलीस संरक्षणात, भीती निर्माण करुन हा महाराष्ट्र बंद लादण्यात आला- आमदार शेलार.
  • आता जनता या सरकारला शासकीय इतमामात निरोप देईल- आमदार शेलार.

मुंबई: ‘महाराष्ट्र बंद’वरून (Maharashtra Bandh) भाजपने (BJP) महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi Govt) घेरण्याचा प्रयत्न केला असून भाजप आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील बंदला शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि जनतेचा विरोध होता पण शासकीय यंत्रणांचा गैरवापर करुन आघाडी सरकारने हा बंद जनतेवर लादला आहे. हा शासकीय ‘इतमामातील’ बंद असून तिघाडी सरकारला जनता ही अशाच प्रकारे शासकीय ‘इतमामात’ निरोप देईल, अशी टीका भाजपा नेते आमदार आशीष शेलार यांनी केली. (bjp mla ashish shelar criticizes aghadi govt over maharashtra bandhbjp mla ashish shelar criticizes aghadi govt over maharasbjp mla ashish shelar criticizes aghadi govt over maharashtra bandhhtra bandh)

बंदच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते पुढे म्हणाले की, आघाडी सरकारला बंद आणि स्थगिती हे दोन शब्द फार प्रिय आहेत. गेल्या पावणे दोन वर्षे याचा अनुभव महाराष्ट्रातील जनता घेते आहे. आता कुठे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांचे जनजीवन सुरळीत होते तेव्हा असे बंद लादण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- ‘महाराष्ट्र बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवादच’; फडणवीस यांचा निशाणा

जनतेचा या बंदला विरोध होता पण शासकीय अधिकारी कालपासून जनतेच्या मनात भिती निर्माण करीत होते, पोलीस आयुक्त कायदा सुव्यवस्था निर्माण होईल सांगत होते. तर बेस्टचे महाव्यवस्थापक पण अशाच प्रकारे बंद यशस्वी कसे होतील या कामाला लागले होते. पोलीस संरक्षणात, भीती निर्माण करुन हा बंद लादण्यात आला त्यामुळे हा बंद शासकीय इतमामातील बंद आहे.

क्लिक करा आणि वाचा- LIVE- आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहेः देवेंद्र फडणवीस

ज्या सोलापूर मधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंदचे आवाहन केले तिथे पहाटे पासून मार्केट यार्ड सुरू होते. शेतकऱ्यांनी आपला माल यार्डात आणला, विकला. गेला बंदला प्रतिसाद दिला नाही. ज्या दादरमध्ये शिवसेना भवन आहे त्या दादरच्या मंडईत शेतीमाल आला, १० वाजेपर्यंत सर्व व्यवहार झाले. शेतकऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला नाही. औरंगाबादसह राज्यातील बऱ्याच मंडयांमध्ये शेतीमाल आला व लिलावही झाले. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने या तिघाडीच्या ढोंगी बंदमध्ये सहभागी झालेले नाहीत.

क्लिक करा आणि वाचा- ‘कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; मुख्यमंत्री- राणेंचे ‘असे’ रंगले वाकयुद्ध

तर, साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज खासदार छत्रपती उदयनराजे स्वतः रस्त्यावर उतरुन बाईक चालवून बंद धुडकारला. शिर्डीत सर्व व्यवहार सुरू आहेत. जनतेने, शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. ठाकरे सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची एवढीच काळजी आहे, तर तुम्ही मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, असे ही आमदार आशिष शेलार म्हणाले.

Source link

ashish shelarbjpmaha vikas aghadi govtmaharashtra bandhआमदार आशीष शेलारभाजपमहाराष्ट्र बंदमहाविकास आघाडी सरकार
Comments (0)
Add Comment