रविवारच्या तुलनेत सोमवारी चित्रपटाची कमाई थेट निम्म्यावर आली. त्यामुळे या आठवड्यात कमाईत आणखी घट झाली तर चित्रपटाला त्याचा खर्च वसूल करणे फार कठीण होऊ शकते. दुसरीकडे सुमारे ३० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘मुंज्या’ अजूनही बॉक्स ऑफिसवर जार धरुन आहे.
कबीर खान दिग्दर्शित ‘चंदू चॅम्पियन’ ही भारताच्या पहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मुरलीकांत पेटकर यांची कथा आहे, या चित्रपटात कार्तिकने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. सिनेमातील त्याच्या अभिनयासाठी त्याचे खूप कौतुकही केले जात आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटाला कार्तिकचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट देखील म्हटले आहे. मात्र, रिव्ह्यूनुसार या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळत नाहीये. या चित्रपटाने फारशी चांगली ओपनिंग केली नव्हती. पहिल्या दिवशी सिनेमाने ४.७५ कोटींची कमाई केली. रविवारी चित्रपटाने ९.७५ कोटींची कमाई केली होती, तर सोमवारी त्याची कमाई कमी झाली.
चंदू चॅम्पियनची एकूण कमाई
sacnilk च्या रिपोर्टनुसार, रविवारी ९.७५ कोटींची कमाई केल्यानंतर सोमवारी या चित्रपटाने ४.७५ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची एकूण कमाई २६.२५ कोटी रुपये झाली आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत जगभरात ३३.०० कोटी रुपयांची कमाई केली होती, तर चार दिवसांत त्याची कमाई ३८ कोटींच्या आसपास पोहचली.
मोना सिंग आणि शर्वरी वाघ यांचा ‘मुंज्या’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट
याशिवाय मोना सिंग आणि शर्वरी वाघ यांचा ‘मुंज्या’ हा चित्रपट गेल्या ११ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची कमाई दररोज आश्चर्यचकित करणारी आहे. अलीकडच्या काळात बड्या स्टार्सचे चित्रपट १० दिवसही टिकू शकले नाहीत पण त्या तुलनेत, हा चित्रपट दमदार कमाई करत आहे.
‘मुंज्या’ने सोमवारी ‘चंदू चॅम्पियन’मागे टाकले
या चित्रपटाने गेल्या रविवारी १० व्या दिवशी ८.५ कोटी अशी सर्वाधिक कमाई केली होती. सोमवारी या चित्रपटाच्या कमाईत घट झाली होती, मात्र असे असूनही त्याने ‘चंदू चॅम्पियन’ला मागे टाकले आहे. ‘मुंज्या’ने ११ व्या दिवशी ५ कोटी रुपये कमवले असून एकूण कमाई ५८.८ कोटींच्या घरात पोहचली आहे. तर जगभरात या सिनेमाने ७२ कोटींची कमाई केली आहे.