नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं केंद्रात सत्ता स्थापन केलं. मंत्रिमंडळ अस्तित्त्वात आल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत १६ जागा जिंकत एनडीएमध्ये भाजपनंतर दुसरा मोठा पक्ष ठरलेला तेलुगू देसम पक्ष (टिडीपी) लोकसभा अध्यक्ष पदासाठी आग्रही आहे. पण भाजप टिडीपीला अध्यक्षपद सोडण्यास तयार नाही. भाजपकडून टिडीपीला उपाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे.
दुसरीकडे इंडिया आघाडी एनडीएला धक्का देण्याच्या तयारीत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन भाजपनं लोकसभा अध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली आहे. मित्रपक्षांशी संवाद साधण्याची जबाबदारी भाजपचे संकटमोटक असलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. राजनाथ सिंह एनडीएतील घटक पक्षांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरतील अशी खात्री भाजपला वाटते. भाजपसाठी टिडीपी आणि जेडीयु या दोन पक्षांचा पाठिंबा सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
अल्पमताच्या सरकारमध्ये लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचं असतं. लोकसभेच्या अध्यक्षांकडे अनेक महत्त्वाचे अधिकार असतात. विश्वासदर्शक ठराव, खासदारांच्या निलंबनाचे अधिकार त्यांच्याकडे असतात. लोकसभेत भाजप बहुमतापासून दूर आहे. अशा परिस्थितीत लोकसभेचं अध्यक्षपद स्वत:कडे राखण्यास भाजपनं प्राधान्य दिलं आहे. अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांनी मोदी सरकार २ मध्ये लोकसभेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे.

दुसरीकडे इंडिया आघाडी लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आग्रही आहे. उपाध्यक्षपद न मिळाल्यास इंडिया आघाडीकडून अध्यक्षपदाचा उमेदवार दिला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत अध्यक्षपदासाठी मतदान होईल. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिडीपीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची भूमिका घेतली आहे. टिडीपीनं लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचा उमेदवार दिल्यास आमचा पक्ष आणि आमचे मित्रपक्ष उमेदवाराला पाठिंबा देतील, असं राऊत म्हणाले होते.