इटलीच्या पंतप्रधान Meloni वापरतात ‘हा’ फोन; जाणून घ्या किंमत

पंतप्रधान मोदी G-7 शिखर परिषदेतून स्वदेशी परतले आहेत. तिथे इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांनी त्यांच्यासोबत शानदार सेल्फी घेतली होती. तसेच एक व्हिडीओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेयर केला आहे. हा व्हिडीओ आणि सेल्फी देशात खूप वायरल झाला आहे. तसेच अनेकांना प्रश्न पडला आहे की जॉर्जिया मेलोनी नेमका कोणता फोन वापरत आहेत?

फोन पाहून कोणीही सहज सांगू शकतं की हा अ‍ॅप्पलचा फोन आहे. याची साइज आणि डिजाइन पाहता हा लेटेस्ट आयफोन 15 प्रो मॅक्स मॉडेल वाटत आहे. चला जाणून घेऊया आयफोनची किंमत किती आहे आणि तुम्ही हा डिस्काउंटसह कुठून विकत घेऊ शकता.

Apple iPhone 15 Pro Max

या आयफोनमध्ये अ‍ॅप्पलच्या जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत जास्त चांगले फीचर्स मिळतात. याची डिस्प्ले साइज देखील मोठी आहे. iPhone 15 Pro Max मध्ये तुम्हाला फोटो-व्हिडीओग्राफीसाठी प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा मिळतो. सेल्फीसाठी यात तुम्हाला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. हा मॉडेल इतर आयफोनच्या तुलनेत खूप महाग आहे कारण हा आयफोन 15 सीरिजमधील टॉप एन्ड मॉडेल आहे.
OnePlus 12R घ्यावा की नवीन Xiaomi 14 CIVI; जाणून घ्या कोणता फोन देतो पैसा वसूल फीचर्स

किंमत

या फोनची किंमत अ‍ॅप्पलच्या वेबसाइटवर 1,59900 रुपये आहे. परंतु हा आयफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून डिस्काउंटसह विकत घेता येईल. अ‍ॅमेझॉनवर आयफोन 15 प्रो मॅक्स तुम्हाला 7 टक्के डिस्काउंटसह फक्त 1,48,900 रुपयांमध्ये मिळत आहे. प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बँक क्रेडिट कार्ड डिस्काउंट देखील दिला जात आहे. निवडक बँकाच्या क्रेडिट कार्डनी पेमेंट केल्यास तुम्ही 3 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळवू शकता.

एक्सचेंज ऑफर

आयफोन 15 प्रो मॅक्सवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तुम्ही तुमचा जुना फोन देऊन 44,250 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. लक्षात असू द्या की ही एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या मॉडेलच्या कंडीशनवर अवलंबून असेल. तुमच्याकडे जुना आयफोन असेल तर जास्त एक्सचेंज व्हॅल्यू मिळण्याची शक्यता आहे. तर अँड्रॉइड फोनची व्हॅल्यू ब्रँड, मॉडेल आणि कंडिशन यावर अवलंबून असेल.

Source link

G7 summititalian pm giorgia meloniitalian pm giorgia meloni clickes selfie pm modiitalian pm giorgia meloni phonemelodi moment againPM Narendra Modiइटली पीएम जॉर्जिया मेलोनीपीएम नरेंद्र मोदी
Comments (0)
Add Comment