Vastu Tips : तुमच्या हातातून या गोष्टी वारंवार पडतात? आर्थिक संकटाचा असू शकतो इशारा!

Falling of These Things are Inauspicious:

आपल्या हातातून काही वस्तू पडली किंवा सांडली तर आपण म्हणतो ठिक आहे, घाईगडबडीत होते असे. पण अतिघाई संकटात नेई तसेच त्यामुळे आपलं काम दुप्पट वाढतं. जर तुमच्या हातातून एखादी वस्तू वारंवार पडते आहे असे घडत असेल तर, त्याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. दैनंदिन घटनांचा संबंध वास्तूशास्त्रासोबत लावला जातो आणि त्यानूसार ते अशुभ संकेत असतात.

1. मीठ हातातून सांडणे

जर तुमच्या हातातून मीठ वारंवार सांडत असेल तर याचा अर्थ, तुमचा शुक्र किंवा चंद्र ग्रहाचा प्रभाव कमी आहे. शुक्राचा प्रभाव कमी असेल तर वैवाहिक जीवनाता अडचणी येवू शकतात. जर चंद्राचा प्रभाव कमी असेल तर श्वसनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. हातातून मीठ पडणे ही घटना महिन्या-दोन महिन्यांत एकदा घडली तर काही हरकत नाही, परंतु जर हे वारंवार तुमच्याकडून होत असेल तर काहीतरी गडबड आहे. घरात कुठला वास्तुदोष तर नाही ना, ज्यामुळे ही घटना घडत आहे, ते तपासून पहावे असे सांगितले जाते.

2. तेल सांडणे

अनेकवेळा घाई-गडबडीत काम करत असताना हातातून तेल गळते. परंतु, असे वारंवार होत असेल तर काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. तेलाला शनि देवाचे प्रतीक मानले जाते आणि प्रत्येक घरात तेल वापरले जाते. विशेषतः जर तेल चुकून जमिनीवर पडले तर त्याला वास्तूशी जोडले जाते. यामुळे तुमच्या कामात अडथळे येतात आणि बर्‍याचदा पैसे गमावण्यास सुरुवात होते. कुटुंबावर संकट किंवा कर्ज वाढणे असे संकेत ही असू शकतात.

3. दूध सांडणे

असे होऊ शकते की, चुकून तुमच्या हातातून दूध सांडू शकते किंवा उकळते दूध उतू जाऊ शकते पण हे जर अनेकदा घडत असेल तर तुम्ही थोडे सावध व्हा. तुमच्या घरात नकारात्मक उर्जा निर्माण करणारी काही कारणे आहेत का ते तपासून पाहा. ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी लावलेला आहे, त्यामुळे दूध सांडणे म्हणजे घरात आर्थिक संकट येणार असे संकेत असतात.

4. काळी मीरी सांडणे

जर काळी मिरी हातातून सांडणे हा देखील अपशकून मानला जातो. असे काही घडले की तुमच्या नात्यात दुरावा वाढेल, असे म्हणतात. विशेष करून पती-पत्नीने यावेळी काळजी घ्यायला हवी. खाली सांडलेली काळी मिरी नकारात्मकतेस प्रोत्साहन देते. जेव्हा हे घडते तेव्हा तुम्ही इतरांशी वाद घालू नये.

5. जेवणाचे ताट पडणे किंवा अन्न सांडणे

तुम्ही जेवण वाढत आहात आणि तुमच्या हातातून अन्न सांडले तर तुमच्या घरी पाहुणे येणार असे म्हणतात. पण जर जेवणाचे ताट खाली पडले आणि सगळे अन्न घरभर विखुरलेल तर घरात दारिद्र्य येते असा समज आहे. तसेच स्वयंपाकघरात वास्तू दोष असू शकतो तो तपासायला हवा.

6. पूजा थाळी पडणे

एखाद्या व्यक्तीच्या हातातून पूजा किंवा आरतीची थाळी पडली तर ते अशूभ मानले जाते, याचा अर्थ आहे तुमच्या पूजेचा स्विकार होणार नाही. तसेच, पूजेचे ताट पडणे हे सूचित करते की तुमच्यावर काहीतरी संकटे येणार आहे.

7. सिंदूर किंवा कुंकू पडणे

सिंदूर किंवा कूंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जातात. मान्यतेनुसार, सिंदूर किंवा कूंकू खाली पडणे म्हणजे पती आणि कुटुंबावर काही संकटे येत असल्याचे लक्षण मानले जाते. कूंकू पडल्यावर त्याला हाताने किंवा झाडूने स्वच्छ करू नये. ते स्वच्छ कापडाने उचलून डब्यात ठेवावे, परंतु जे पडल्याने खराब झाले आहे ते पाण्यात टाकावे आणि सर्व काही ठीक होईल अशी कुलदेवतेला प्रार्थना करावी.

8. कलश किंवा पाण्याने भरलेले भांडे पडणे

पूजेसाठी कलशात पाणी घेऊन जाताना तो हातातून सुटला तर तो अपशकून मानला जातो. पाण्याने भरलेला तांब्या, पाण्याने भरलेला ग्लास हातातून पडणे या गोष्टी देखील शुभ मानल्या जात नाहीत. हातातून पाण्याचे भांडे पडले म्हणजे पित्र दुखावतात तसेच कुटुंबात दुरावा निर्माण होतो असे मानले जाते. जुन्या काळी लोक अशा घटना घडल्यावर अन्न शिजवताना प्रमाण वाढवत असत जेणेकरून पाहुणे आले तर त्यांच्यासाठी जेवण कमी पडू नये.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

AdhyatmikFalling Of These Thingsinauspicious signsSpiritualVastu Tipsकलशकुंकूपूजेचे ताटमीठवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment