Samsung Galaxy F14 5G
या फोनचा 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल सेलमध्ये 8,990 रुपयांना मिळत आहे. फोन खरेदीसाठी जर तुम्ही सॅमसंग अॅक्सिस बँकेच्या इन्फाइनाइट किंवा सिग्नेचर क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 10 टक्के डिस्काउंट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्डवरून पेमेंट केल्यास युजर्सना 5 टक्के कॅशबॅक दिला जात आहे. फोन सुलभ हप्त्यांवर देखील खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये 4,450 रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. फीचर्स पाहता, या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 6000mAh च्या बॅटरीसह 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल.
Samsung Galaxy A05
4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 8299 रुपये आहे. हा फोन 1 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. यासाठी तुम्हाला SBI च्या कार्डने पेमेंट करावे लागेल. HDFC बँकेच्या डेबिट कार्डनं ईएमआय ट्रँजॅक्शन केल्यास तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतचा फायदा होऊ शकतो. 5 टक्के कॅशबॅकसाठी तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने पेमेंट करू शकता. या फोनचा ईएमआय 292 रुपयांपासून सुरु होत आहे. हा फोन 5000mAh बॅटरी आणि 50 मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्यासह येतो.
Samsung Galaxy M14
4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन सेलमध्ये 8778 रुपयांमध्ये मिळत आहे. फोन खरेदीसाठी जर तुम्ही SBI कार्डचा वापर केला तर तुम्हाला 1 हजार रुपयांची सूट मिळेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या कार्ड होल्डर्सना कंपनी 5 टक्के कॅशबॅक देत आहे. HDFC बँकेच्या डेबिट कार्डने केलेल्या ईएमआय ट्रँजॅक्शनवर तुम्हाला 1500 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. याचा ईएमआय 309 रुपयांपासून सुरु होत आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 6000mAh ची बॅटरी मिळेल.