Budhwarche Upay : पती-पत्नीच्या नात्यात सतत भांडणं होताय? बुधवारी करा हे उपाय, राहिल श्रीगणेशाची कृपा

Budhwarche Upay :

बुधवारचा दिवस श्रीगणेशाला समर्पित करण्यात आला आहे. श्रीगणेशाला प्रथम पूजनीय देवता मानले गेले आहे. भगवान गणेशाची पूजा प्रत्येक शुभ कार्यात सगळ्यात आधी केली जाते.

हिंदू धर्मात श्रीगणेशाच्या पूजेशिवाय कार्य अपूर्ण मानले जाते. श्रीगणेशाच्या आशीर्वादाने कोणतेही काम सुरु केले तर ते निश्चितपणे यशस्वी होते, असे म्हटले जाते. बुधवारी नियमितपणे गणपतीची आराधना केल्याने सर्व भक्तांचे अडथळे दूर होतात तसेच समृद्धीचे आशीर्वाद ही मिळतात. म्हणून त्याला विघ्नहर्ता असे म्हटले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार बुधवारी गणपतीची पूजा आणि आरती करण्याव्यतिरिक्त तुम्ही या दिवशी गणपतीच्या मंत्राचा जप केला तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. असे म्हटले जाते की, जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी गणपतीची पूजा करण्यासोबतच काही उपाय केल्याने सर्व त्रास दूर होतो.

बुधवारी करा हे उपाय

1. वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील आणि खूप प्रयत्न करुन नवरा-बायकोच्या नात्यातील वाद संपत नसेल तर बुधवारी हे उपाय अवश्य करा. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी गणपतीच्या प्रतिमेला हळदी आणि कुंकू लावा. यानंतर ऊँ गं गणपतये नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करा. यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे संपतील.
2. श्रीगणेशाला बुद्धीचा स्वामी म्हटले जाते. ज्या व्यक्तीवर गणपतीची कृपा असते त्याची बुद्धी तीक्ष्ण असते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत असेल, नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात समस्यांना समोरे जावे लागत असेल तर दर बुधवारी गणपतीची पूजा करा. तसेच ५, ११ किंवा २१ दुर्वा अर्पण करा.
3. अनेक वेळा कष्ट करुनही आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल आणि इच्छा असूनही बाहेर पडता येत नसेल तर बुधवारच्या दिवशी हाताने बनवलेली गणपतीच्या मूर्तीची पूजा करा. त्यासमोर बसून गणेश चालीसाचे पठण करा. तसेच गणेशाचे ध्यान करावे. या उपायांचा अवलंब केल्याने आयुष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या दूर होतील.

टीप :
ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

astrology WednesdayBudhwarche UpayMarriage LifeWednesday astrologyWednesday remediesWednesday upayबुधवार
Comments (0)
Add Comment