मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एखाद्या व्यक्तीला भेटण्याची पद्धत फार वेगळी आहे. ते मिठी मारत नाहीत तर ते आपला आनंद इतर पक्षाच्या मंत्र्यांशी डोक्याला डोकं लावून करतात. नितीश कुमार यांचे सर्वात आवडते आणि जवळचे मंत्री म्हणजे अशोक चौधरी. ते नेहमीच अशोक चौधरी यांची प्रशंसा करताना दिसतात.
नितीश कुमारांनी उत्साहात मंत्र्यांची डोकी एकमेकांना लावली
लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पहिल्यांदाच सर्व मंत्री एका कार्यक्रमात जमले होते. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार हे खूपच उत्साहित दिसले. यावेळी आनंदाच्या भरात त्यांनी आपले प्रिय मंत्री अशोक चौधरी यांचे डोके मंत्री प्रेम कुमार यांच्या डोक्याला लावले. यानंतर ते अशोक चौधरी यांचा हात पकडून बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे नेले. तिथेही या दोघांची डोकी एकमेकांना लावली.
मंत्री प्रेम कुमार आणि विजय कुमार सिन्हा हे दोघेही भाजपचे नेते आहेत. अशोक चौधरी हे जेडीयूचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार बऱ्याच दिवसांनी झालेल्या या भेटीमुळे इतके उत्साहित झाले होते की त्यांनी आपल्या आणि भाजप नेत्यांची पुन्हा डोकी एकमेकांना लावत भेट घडवून आणली.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांची जेडीयू आणि भाजप नेत्यांची डोकी एकमेकांना लावण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही नितीश कुमार यांनी आपले मंत्री अशोक चौधरी यांचं डोकं पाटण्यातील पत्रकाराच्या डोक्याशी लावून त्यांच्यात भरत-भेट घडवून आणला होता. त्यावेळीही मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घडवून आणण्याची ही पद्धत चर्चेचा विषयी ठरली होती. त्यानंतर बिहारच्या राजकीय समीकरणात अनेक बदल पाहायला मिळाले होते.
जेव्हा हे सारं घडत होतं तेव्हा जवळच उभे असलेले बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या कृतीकडे हसून बघत होते. मंगल पांडे, अशोक चौधरी आणि भाजप-जेडीयूचे इतर नेतेही यावेळी उपस्थित होते.