Motorola Edge 50 Ultra चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला एज 50 अल्ट्रा अँड्रॉइड 14 आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा P-OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिजोल्यूशन 2,712 x 1,220 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 144Hz आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 व पीक ब्राइटनेस 2500 निट्स आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि फेस अनलॉक फीचर मिळतो.
एज 50 अल्ट्रा मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP चा मेन सेन्सर, 64MP ची टेलीफोटो लेन्स आणि 50MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा Moto AI फंक्शनसह आला आहे. त्यामुळे शानदार फोटो क्लिक केले जाऊ शकतात. तसेच, सेल्फीसाठी हँडसेटच्या फ्रंटला 50MP चा कॅमेरा मिळतो.
कंपनीनं नवीन स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर दिला आहे. स्मूद फंक्शनिंगसाठी फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे. मोटोरोलाच्या नवीन डिव्हाइसमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 125W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W वायरलेस पावर शेयरिंगची सुविधा मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी हँडसेटमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, ड्युअल सिम स्लॉट आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे स्पेक्स देण्यात आले आहेत.
Motorola Edge 50 Ultra ची किंमत
स्मार्टफोन ब्रँड मोटोरोलानं या 5G फ्लॅगशिप फोनची किंमत 59,999 रुपये ठेवली आहे. तसेच मर्यादित कालावधीसाठी सूट आणि बँक डिस्काउंटसूट फोन 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या किंमतीत 12GB+512GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. याची सेल Flipkart वर 24 जूनपासून सुरु होईल.