Bihar Bridge Collapsed: १२ कोटींच्या नव्या पूलाला उद्घाटनापूर्वीच जलसमाधी; ५० गावांचा संपर्क तुटला

पाटणा : बिहारच्या सिकटी येथील बकरा नदीच्या पडरिया घाटावर असलेला पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला आहे. पूर्वीच्या पुलाचा अॅप्रोच कट झाल्यानंतर १२ कोटी रुपये खर्चून हा नवा पूल उभारण्यात आला होता. जो पूल देखील आता नदीत सामावला आहे.

पूल बनवताना निकृष्ट दर्जाची सामग्री वापरल्याने हा पूल पडला असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच या पुलाकडे जाण्याचा अप्रोच कट झाल्याने मार्ग पूर्ववत करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न सुरू झाले, मात्र त्यापूर्वीच पूल कोसळला. तर येथील स्थानिक आमदार विजय कुमार मंडल यांचे म्हणणे आहे की, ‘यापूर्वी याठिकाणी पूल बांधण्यात आला तेव्हा पुरामुळे नदीचे पात्र वाहून गेले होते. यानंतर १२ कोटी रुपये खर्चून नदीपात्रापर्यंत पुलाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. मात्र विभागातील लोकांनी लक्ष न दिल्याने ठेकेदाराने योग्य काम केले नाही.’

१८२ मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम २०२१ मध्ये सुरू झाले होते. या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून निधीची तरतूद करण्यात आली होती. २०२२ पर्यंत पूल बांधून पूर्ण होणार असल्याचा अंदाज होता, परंतु पूलाचे काम जून २०२३ मध्ये पूर्णत्वास आले.
West Bengal Train Accident: कोणाचा हात कापलेला, तर कोणाचा पाय…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली मन विषण्ण करणारी आँखोदेखी
सदर पूलाचे काम ग्रामीण बांधकाम विभागांतर्गत शेजारील किशनगंज जिल्ह्यातील ठेकेदाराला देण्यात आले होते. एकूण बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून केला जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे त्यावरून रहदारी सुरु नव्हती. पण गेल्या दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबला भेगा पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यातच मंगळवारी हा पूल अचानक कोसळला आहे.
दूध ३०० रु. लीटर, पीठ ८०० रु. किलो! नागरिकांचा भुकेने जीव जातोय, तरीही शस्त्रे, सैन्यावर देश का करतोय आवाक्याबाहेरचा खर्च?
यापूर्वीही बिहारमधील महत्वाकांक्षी प्रकल्प मानले जाणारे पूल कोसळले होते. गतवर्षीच्या जूनमध्ये भागलपूर आणि खगडीयाला जोडणारा अगुआनी-सुलतानगंज पूल कोसळला. तर सप्टेंबर मध्ये बांकामधील जिलानीपथ येथील खेसर-तारापूर मुख्य रस्त्यावरील बहोर्णा गावानजीकच्या लोहगर नदीवरील बांधलेला पूल पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीत सामावून गेला होता. ज्यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता.

Source link

bakra nadiBihar Bridge Collapsedbihar govtbihar incidentnitish kumar govtनितीश कुमार सरकारबकरा नदीवरील पूल दुर्घटनाबिहारबिहार पूल दुर्घटनाबिहारमधील घटना
Comments (0)
Add Comment