पश्चिम बंगालच्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी ही बैठक सुमारे ३५ मिनिटे चालली. रॉय यांच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी बॅनर्जी यांनी जिल्ह्याच्या मुख्यालयात असलेल्या मदन मोहन मंदिरात प्रार्थना केली. ममता बॅनर्जी यांचे सोमवारी संध्याकाळी कूचबिहारमध्ये आगमन झाले. सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील कांचनजंगा एक्स्प्रेस दुर्घटनेतील पीडितांची ममता बॅनर्जींनी भेट घेतली.
तृणमूल काँग्रेसने (TMC) कूचबिहार लोकसभा जागेवर यंदा भाजपला धूळ चारली. विद्यमान खासदार निसिथ प्रामाणिक यांचा जवळपास ४०.००० मतांनी पराभव केला. या निवडणुकीतील निकालानंतर प्रदेशातील राजबंशी समुदायावर रॉय यांचा लक्षणीय प्रभाव लक्षात घेऊन संभाव्य नवीन राजकीय समीकरण बदलू शकतात अशा चर्चेंना उधाण आले आहे.
या घडामोडीवर राज्य भाजपने अद्याप भाष्य केलेले नाही, त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. रॉय यांनी बैठकीनंतर भविष्यात काय होते ते पाहू अशी गूढ प्रतिक्रिया दिली आहे.