महायुतीला फटका, मात्र फडणवीसांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब; खांदेपालटास केंद्राचा नकार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मोठा फटका बसला असला तरी केंद्रीय नेतृत्व राज्यात तूर्त नेतृत्वबदल करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चांना पूर्णविराम देताना, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका विद्यमान नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असे सांगितले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावरच शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजप कोअर कमिटीची बैठक

विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांच्या सुकाणू समित्यांच्या बैठका दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आदींच्या उपस्थितीत सुरू आहेत. राज्याच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे उपस्थित नव्हते.

महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यांत लोकसभा निवडणुकीत भाजपचा आलेख घसरला. या पार्श्वभूमीवर या राज्यांतील विधानसभा निवडणुका भाजप कोणाच्या नेतृत्वाखाली लढवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, महाराष्ट्रापुरते तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्वाने शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे.
Ravindra Waikar : रवींद्र वायकर ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरेंशी भेट; EVM हॅकिंगवर म्हणतात, मोदींनीही ४०० पार…

विधानसभेच्या तयारीला लागा

फडणवीस यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निराशाजनक कामगिरीनंतर आपल्याला सरकारमधून पदमुक्त करण्याची मागणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. अमित शहा यांच्याशी दोनदा चर्चा झाल्यावर ती मागणी पक्षश्रेष्ठींनी फेटाळली. फडणवीस यांना पद न सोडण्याचे आदेश देतानाच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा संदेश शहा यांच्यामार्फत फडणवीस यांना देण्यात आला होता.
Rupali Patil : महिलांना ठराविक काळाने पदं वाटून मिळावीत, रुपाली पाटलांची दादांकडे मागणी, रोख चाकणकरांकडे?

अधिक ताकदीने लढू

सुकाणू समितीच्या मंगळवारच्या बैठकीनंतर फडणवीस आणि गोयल यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनंतर ही बाब अधोरेखित झाली. राज्यात महायुती केवळ ०.३ टक्के मतांनी पिछाडीवर राहिली. त्या आधारावर विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली, असे सांगून, आगामी विधानसभा निवडणुका महायुतीतील तीनही पक्ष आणखी ताकदीने लढवतील, असे फडणवीस यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

फडणवीसांनी काय सांगितले?

या बैठकीत विधानसभेच्या आगामी रणनीतीवर प्राथमिक चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते बोलत असतानाच गोयल यांनी कागदावर काहीतरी लिहून तो कागद फडणवीस यांच्यासमोर धरला. त्यानंतर, लवकरच घटकपक्षांबरोबरही चर्चा करून आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी ठोस कार्यक्रम आखण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. केंद्रीय नेतृत्व राज्यातील महायुतीमागे ठामपणे उभे असल्याचे फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या तुलनेत महायुतीला फक्त ०.३ टक्के मते कमी मिळाली. याच आधारावर आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यात येत असून, घटक पक्षांसह ही निवडणूक आणखी ताकदीने लढवणार आहोत.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Source link

BJP Core Committee MeetingBJP Shiv Sena MahayutiDevendra FadnavisPiyush GoelVidhan Sabha Elections 2024देवेंद्र फडणवीसभाजप कोअर कमिटी बैठकभाजप शिवसेना महायुतीविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment