कंपनी CMF Buds Pro 2 TWS इअरबड्स आणि CMF Watch Pro 2 स्मार्टवॉच देखील लाँच करेल, जे गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या मॉडेलचे अपग्रेड व्हर्जन असतील. CMF Phone 1 च्या नवीन टीजर मध्ये अजूनही एक लॉक दिसत आहे जो एक रिप्लेसेबल बॅक कव्हर असण्याची शक्यता आहे.
CMF Phone 1चे स्पेसिफिकेशन्स
नवीन रिपोर्ट्समध्ये हा मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसरवर आधारित असेल, जो अलीकडेच सादर करण्यात आला होता. हा माडियाटेक डायमेन्सिटी 7050 चा अपग्रेड आहे, जो Nothing Phone 1 मधील स्नॅपड्रॅगन 778G+ सारखा परफॉर्म करणे अपेक्षित आहे. याआधी आलेल्या CMF Phone 1 मध्ये 6.67 इंचाचा OLED डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. कॅमेरा सेटअप पाहता या स्मार्टफोनच्या मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. या स्मार्टफोनमध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB किंवा 256GB UFS 2.2 स्टोरेज असेल, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी मिळेल.
आतापर्यंत CMF Buds Pro 2 आणि Watch Pro 2 बाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु टीजर वरून एक स्मार्ट डायलची माहिती मिळाली आहे, जसा CMF Neckband Pro मध्ये दिसला होता. स्मार्टवॉचच्या टीजरमध्ये राउंड डायल व्यतिरिक्त कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. येत्या आठवड्यांमध्ये या डिवाइसची माहिती समोर येऊ शकते. 8 जुलैला लाँच इव्हेंट दुपारी 2:30 वाजता आयोजित केला जाईल.