Shiv temple Trishul :
शंभोशंकराच्या मंदिरात जावून आपण शिवशंकराची मनोभावे पूजा, अभिषेक करत असतो. तुम्ही पाहिलं असेल शंकराच्या मंदिरात त्यांची विविध प्रतिके आपल्याला पहायला मिळतात, त्यामधील एक प्रमुख प्रतिक म्हणजे त्रिशुळ ! त्रिशुळ हे भगवान शिवाच्या शक्तीचे प्रतीक आहे. वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी महादेवाने त्रिशुळाचा उपयोग केला यासंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. शिवपुराणात असे म्हटले आहे की संपूर्ण विश्वाच्या प्रारंभी भगवान शिव ब्रह्मनादातून प्रकट झाले. त्याच्याबरोबर रज, तम आणि सत् गुण देखील प्रकट झाले. या तीन गुणांनी मिळून शिवशूल तयार झाले, ज्यापासून त्रिशुळ तयार झाले.
1. त्रिशूळावर लाल वस्त्र का बांधतात ?
असे मानले जाते की लाल रंगाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे आणि मंगळ शंभोशंकराचा अंश मानला जातो. भगवना शंकर यांच्यामुळेच मंगळाची उत्पत्ती झाली असे म्हणतात.
यासंदर्भात एक पौरणिक कथा सांगितली जाते. मंगळ ग्रहाला शंभोशंकराच्या सानिध्यात राहायचे होते. त्यासाठी मंगळ ग्रहाने कठीण तपस्या सुरु केली. आता भोलेनाथ प्रत्येक भक्ताला संकटातून सोडवतात. मंगळाच्या कठोर तपस्येबद्दल त्यांना समजले. ते मंगळाच्या तपस्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनी मंगळाला वरदान मागायला सांगितले. मंगळ ग्रहाने त्यांना इच्छा बोलून दाखवली.
2. लाल रंगाला त्रिशुळासोबत जोडले !
तेव्हा शंभोमहादेव त्याला म्हणाले, ‘ते ग्रहाच्या चक्रापासून दूर राहू इच्छितात आणि एखाद्या ग्रहाला स्वतःच्या जवळ ठेऊ शकत नाहीत.’ पण मंगळ ग्रह ऐकायला तयार नव्हता. त्याला महादेवाच्या सान्निध्यात राहायचेच होते. अखेर मंगळ ग्रहाने असे सांगितले, माझ्या एखाद्या प्रतीकाला तुम्ही स्वतःच्या प्रतीकाशी जोडून घ्यावे. तेव्हा महादेवाने लाल रंगाला त्रिशूळाशी जोडून घेतले.
भगवान शिवाने तेव्हा लाल रंगाचे कापड घेऊन ते स्वतःच्या त्रिशूळाला बांधले तेव्हापासून त्रिशूळावर लाल वस्त्र बांधण्याची प्रथा सुरू झाली, असे सांगितले जाते. आज ही तुम्ही पाहिलं असेल की शंभोशंकराच्या मंदिरात जे त्रिशुळ स्थापन केलेले असते, त्यावर एक लाल रंगाचे वस्त्र बांधलेले असते. ज्योतिषशास्त्रात ही गोष्ट महत्त्वाची असून लाल रंगाचे कापड त्रिशूळाला बांधले तर मंगळ ग्रह मजबूत होतो आणि दोष दूर होतात असे म्हणतात.
असे मानले जाते की जे भक्तगण शंकराच्या मंदिरात त्रिशूळावर लाल वस्त्र बांधतात त्यांना मंगळ दोषापासून मुक्ती मिळते. त्यांच्या जन्मकुंडलीमधील अशुभ प्रभाव दूर होतात. ज्या भक्तांना भगवान शंकरासोबत मंगळदेवाचा आशीर्वाद हवा असेल त्यांनी हे शुभ कार्य अवश्य करावे.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.