भाडं मिळेना, घरमालक संतापला, नको ते करुन बसला; विचित्र घटनेची परिसरात चर्चा

चेन्नई: तमिळनाडूत एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे. घर भाडं न दिल्यानं एका घरमालकानं भाडेकरुच्या घरापर्यंत जाणारा जिना तोडला. यानंतर शेजाऱ्यांनी आपत्कालीन पथकाला बोलावून भाडेकरुची शिडीच्या मदतीनं सुटका केली. अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यात आलं. पहिल्या मजल्यावर राहणारा भाडेकरु गेल्या काही महिन्यांपासून घर भाडं देत नव्हता.

तमिळनाडूच्या कांचीपुरमध्ये वनविल नगर आहे. तिथे वेणुगोपाल नावाचा व्यक्ती राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याला पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे त्याला चालणं, फिरणं अवघड झालं. वेणुगोपाल एका इमारतीत पहिल्या मजल्यावर भाड्यानं राहतो. त्या इमारतीच्या मालकाचं नाव श्रीनिवासन आहे.
पुन्हा हिट अँड रन! खासदार कन्येच्या कारनं तरुणाला चिरडलं; फरार आरोपीला लगेच जामीन
शारिरीक व्याधींमुळे वेणुगोपाल यांना श्रीनिवासन यांना काही महिने घर भाडं देता आलं नाही. श्रीनिवासन यांनी अनेकदा घर भाड्याची मागणी केली. पण वेणुगोपाल भाडं देऊ शकले नाहीत. त्यामुळे श्रीनिवासन यांनी त्यांना घर रिकामं करण्यास सांगितलं. त्यावर वेणुगोपाल यांनी एका वकिलाची मदत घेतली. त्यांनी घर रिकामं करण्यासाठी अधिकचा वेळ घेतला. त्यामुळे श्रीनिवासन नाराज झाले.
Shiladitya Chetia: पत्नीचं कर्करोगामुळं निधन, काही मिनिटातच IPS अधिकाऱ्यानं ICU मध्येच स्वत:ला संपवलं
वेणुगोपालवर संतापलेल्या श्रीनिवासन यांनी काही मजूर बोलावले. त्यांना पहिल्या मजल्याकडे जाणाऱ्या जिनाच्या पायऱ्या तोडायला सांगितल्या. श्रीनिवासन यांच्या सांगण्यावरुन मजुरांनी पायऱ्या तोडल्यानं वेणुगोपाल आणि त्यांचं कुटुंब वर अडकलं. शेजाऱ्यांना ही बाब समजली. त्यांना या प्रकारामुळे धक्काच बसला. त्यांनी आपत्कालीन मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच पथक पोहोचलं. त्यांनी वेणुगोपाल आणि त्यांच्या कुटुंबाची सुटका केली. दोरी आणि शिडीच्या मदतीनं त्यांनी कुटुंबाला खाली आणलं.

Source link

landlordtamilnadutenantघरमालकतमिळनाडूभाडेकरु
Comments (0)
Add Comment