Rahul Gandhi Birthday : ‘माझा सखा, एक मार्गदर्शक!’ राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त बहिण प्रियंकांनी दिल्या गोड शुभेच्छा

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाकडून नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातोय. राहुल गांधी यांचा ५४ वा वाढदिवस असून त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी देखील आपल्या भावाला गोड आणि धैर्यशील शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रियंका गांधींनी ‘एक्स’ वर भावनिक पोस्ट करत म्हटले की, माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्याचं जीवन, विश्व आणि प्रत्येक गोष्टीबद्दलचा अनोखा दृष्टीकोन नेहमीच मार्ग प्रज्वलित करणारा असतो. तो नेहमीच माझा सखा, माझ्या प्रवासातील सोबती, एक तर्कनिष्ठ मार्गदर्शक, तत्वज्ञानी आणि नेता असेल. असाच चमकत राहा, तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे.

दरम्यान खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या वाढदिवशी काँग्रेस कार्याकार्यकर्त्यांना मोठा सोहळा न करता माणुसकीच्या नात्याने दानधर्म करण्याचे आवाहन केले होते.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील राहुल गांधीना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

‘राहुल गांधींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताच्या राज्यघटनेत दिलेल्या मूल्यांप्रती तुमची अतूट बांधिलकी आणि लाखो लोकांच्या आवाजांबद्दल तुमची अतूट करुणा, हे गुण तुम्हाला वेगळं ठरवतात. सत्तेला सत्याचा आरसा दाखवून, शेवटच्या व्यक्तीचे अश्रू पुसण्याचे काम तुम्ही सुरू केले आहे. विविधतेतील एकता, सौहार्द आणि करुणा ही काँग्रेस पक्षाची नीतिमत्ता तुमच्या सर्व कृतीतून दिसून येते,’ असे मल्लिकार्जुन खर्गेंनी आपल्या ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये लिहले आहे.

काँग्रेसने देखील पक्षाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर पोस्ट लिहून आपल्या नेत्याला ‘जननायक’ संबोधले आहे. ‘नेहमी प्रेमच निवडण्यास शिकवणाऱ्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जेव्हा तुमच्यावर द्वेष केला जातो तेव्हा प्रेम निवडा, जेव्हा दयाळूपणा अशक्य दिसतो तेव्हा प्रेम निवडा, जेव्हा परिस्थिती गंभीर होते तेव्हा प्रेम निवडा, जेव्हा करुणा कमी होते तेव्हा प्रेम निवडा,’ अशा मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ‘असा एक नेता जो राग, द्वेष आणि अश्रूंच्या विरोधात उभा राहिला. एक नेता ज्याने आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आघाडीवर राहून नेतृत्व केले. एक नेता ज्याने प्रकाश दिला आणि पुन्हा आशा जागवली. राहुल गांधी तुम्ही तुमच्यासारखेच राहिलात यासाठी धन्यवाद.’ असे प्रेरणादायी भावना देखील पोस्ट मधून व्यक्त करण्यात आली आहे.

Source link

congress aicccongress leaderjannayakPriyanka GandhiRahul GandhiRahul Gandhi birthdayकाँग्रेस कार्यकर्त्यांकडून वाढदिवस साजराकाँग्रेसचे मुख्य नेतेप्रियंका गांधीराहुल गांधी वाढदिवसराहूल गांधी
Comments (0)
Add Comment