चेन्नई: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या खासदाराच्या लेकीच्या कारखाली आल्यानं एक मद्यधुंद तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाला कारखाली चिरडून खासदाराच्या लेकीनं तिथून पळ काढला. पोलिसांनी तिचा माग काढत अटकेची कारवाई केली. पण अवघ्या काही तासांमध्ये तिला पोलीस ठाण्यातच जामीन मिळाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी वायएसआर काँग्रेसचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी आहे. तिचं नाव माधुरी आहे. माधुरीच्या कारनं बेसेंट नगर परिसरात रस्त्याच्या कडेला एका तरुणाला चिरडलं. हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. तरुणाचा काही वेळातच मृत्यू झाला. सूर्या असं त्याचं नाव आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास सूर्या मद्यधुंद अवस्थेत बेसेंट नगर परिसरात पदपथाजवळ रस्त्याच्या कडेला झोपलेला होता. त्यावेळी तिथे एक कार आली. त्यात माधुरी आणि तिच्या मैत्रिणी होत्या. माधुरीच्या कारनं सूर्याला चिरडलं.
दुर्घटनेनंतर स्थानिक अपघातस्थळी जमले. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात माधुरीची मैत्रीण स्थानिकांसोबत वाद घालताना दिसत आहे. त्याला (सूर्याला) रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली असल्याचं माधुरीची मैत्रीण सांगत असल्याचं व्हिडीओत दिसतं. रुग्णवाहिकेसाठी कॉल केल्यानंतर स्थानिक लोक संतापले. त्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो असं आरोपींनी सांगितलं.