काही मिनिटांत ओळखा बनावट साइट्स आणि ॲप्स; सरकार देते आहे महत्त्वाच्या टिप्स

ऑनलाइन खरेदी सर्वात सोपी आहे. पण ऑनलाइन शॉपिंग तुम्हाला फ़सवू ही शकते. ऑनलाइन खरेदीबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी येत आहेत. ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली बनावट शॉपिंग वेबसाइट्स आणि बनावट ऑनलाइन जाहिरातींद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. तथापि, केंद्र सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-IN) ऑनलाइन शॉपिंगच्या संदर्भात काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स फॉलो करून काही मिनिटांत बनावट वेबसाइट आणि पोर्टल शोधले जाऊ शकतात आणि त्याची तक्रार देखील केली जाऊ शकते.

बनावट वेबसाइट कशी ओळखायची

  • नेहमी वेबसाइटचे डोमेन नाव जसे की .com, .in तपासा.
  • वेबसाइटचा वेब पत्ता तपासा. तसेच वेबसाइट पेज https:” ने सुरू व्हायला हवे.
  • युजर्सनी लहान URL वर क्लिक करू नये.
  • लहान URL वर क्लिक करण्याऐवजी, तुम्ही त्या कॉपी करा आणि मूळ URL सह प्रमाणित करा.
  • वेबसाइटच्या नावाचे स्पेलिंग नक्की तपासा.

ऑनलाइन खरेदी करताना द्या लक्ष

ऑनलाइन खरेदीसाठी मूळ ॲप्स आणि वेबसाइट वापरा.
सोशल मीडियावरून ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सना भेट देऊ नका, कारण ही लिंक फसवी असू शकते.
नेहमी अधिकृत ॲप्लिकेशन्सवरून ऑनलाइन शॉपिंग ॲप्स आणि वेबसाइट्स डाउनलोड करा.
ऑनलाइन ऑर्डर देताना नेहमी सुरक्षित वाय-फाय कनेक्शन किंवा इंटरनेट वापरा.

या गोष्टींकडे लक्ष द्या

सर्व ईमेल, बँक आणि सोशल मीडिया खात्यांवर मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन एनेबल केले पाहिजे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ऑनलाइन शॉपिंग लिंक्स,जाहिराती, ऑफर्सवर क्लिक करू नये.
बँक, कार्ड तपशील, ओटीपी आणि लॉगिन तपशील यासारखी संवेदनशील माहिती कोणाशीही शेअर करू नका.

कुठे तक्रार करायची

तुम्हाला काही संशयास्पद वाटल्यास तुम्ही www.cybercrime.gov.in वर तक्रार करू शकता. तुम्ही 1930 वर कॉल करूनही तक्रार नोंदवू शकता

Source link

cyber crimefake websiteonline shoppingऑनलाईन शॉपिंगफसव्या वेबसाईटसायबर गुन्हे
Comments (0)
Add Comment