Oppo A3 Pro चा भारतीय व्हेरिएंट लवकरच बाजारात लाँच केला जाऊ शकतो. टिपस्टर सुधांशु अंभोरेनं ही माहिती दिली आहे. टिपस्टरनं फोनची लाइव्ह इमेज शेयर केली आहे. हा फोन रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूलसह दिसत आहे ज्यात 2 कॅमेरा सेन्सर आहेत. तिसऱ्या कटआउटमध्ये LED देण्यात आली आहे. फोटो पाहून दिसत आहे की फोन पर्पल शेडमध्ये आहे.
फोनची फ्रंट साइड पाहता, यात फ्लॅट डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये पंचहोल कटआउट आहे. यात 360 डिग्री डॅमेज प्रूफ बॉडी आहे जो फोनच्या चिनी व्हेरिएंटचा फीचर देखील आहे. तसेच फोनमध्ये स्प्लॅश टच फीचर आहे. म्हणजे फोनची स्क्रीन ओली असली तरी बिनदिक्कत वापरता येईल.
Oppo A3 Pro च्या भारतीय व्हेरिएंटमध्ये 6.6 इंचाचा डिस्प्ले असेल. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट सांगण्यात आला आहे. त्याचबरोबर 8जीबी रॅम, आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज असेल. फोनमध्ये 5100mAh ची बॅटरी असेल आणि 45W SuperVOOC चार्जिंग मिळेल.
कॅमेरा पाहता, यात 50 मेगापिक्सलचा रियर मेन कॅमेरा असेल. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला हा 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनची किंमत देखील टिपस्टरनं सांगितली आहे. याचा 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट 17,999 रुपयांपासून सुरु होईल. तर 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये सांगण्यात आली आहे.