Hajj Yatra : मक्केत उष्णतेचा पारा 52 अंशावर, उष्णतेमुळे ५५० हून अधिक हज यात्रेकरूंचा झाला मृत्यू

मक्का : ‘हज’ यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेलेल्या जगभरातील 550 यात्रेकरूंचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकूण मृत पावलेल्या लोकांपैकी 323 इजिप्त या देशातील यात्रेकरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या मक्केत उष्णतेचा पारा 52 अंशावर जाऊन पोहोचला आहे. ‘हज’ यात्रेसाठी जगभरातील यात्रेकरू हे सौदी अरेबियाला जातात. त्यामुळे चेंगराचेंगरीबरोबरच उष्माघातासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात.

एएफपीला या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे तसेच मृतांपैकी किमान 60 जण जॉर्डन देशातील होते. तर इंडोनेशिया, इराण आणि सेनेगल या देशातील नागरिकांचा समावेश आहे. परंतु अजून काही देशांनी मृतांची आकडेवारी जाहीर केली नाही. दरम्यान गेल्या वर्षी हजयात्रेमध्ये विविध देशांतील सुमारे 240 यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश नागरिक इंडोनेशियातील होते.

2000 यात्रेकरूंवर उपचार सुरू

गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी उष्णतेने त्रस्त असलेल्या 2,000 हून अधिक यात्रेकरूंवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती. मात्र रविवार, १६ जूनपासून ही आकडेवारी अपडेट करण्यात आलेली नाही. तसेच मृत्यूबाबतही माहिती देण्यात आलेली नाही.
Hinduja: ‘नोकरांपेक्षा पाळीव कुत्र्यांवर खर्च’; अब्जाधीश कुटुंबावर गंभीर आरोप, घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्याने म्हटले…

धार्मिक स्थळे असलेल्या भागात तापमान ०.४ अंश सेल्सिअसने वाढले

सौदी अरेबियामध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, धार्मिक स्थळे असलेल्या भागातील तापमान दर दशकात ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे. तर सौदी राष्ट्रीय हवामान केंद्रानुसार, सोमवार, (17 जून) रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीमध्ये तापमान 51.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले.

यात्रेकरू शरीर थंड ठेवण्यासाठी डोक्यावर ओतताय पाणी

मक्का बाहेरील मिना शहरात यात्रेकरूंची बिकट परिस्थिती असल्याची माहिती एएफपीच्या पत्रकारांनी दिली आहे. यात्रेकरू शरीर थंड ठेवण्यासाठी डोक्यावर डोक्यावर पाणी ओतत आहे. तसेच यात्रेकरूंना उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी स्वयंसेवक थंड पेय आणि आईस्क्रीम देत आहेत. तर सौदी अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे, पुरेसे पाणी प्यावे आणि दिवसाच्या सर्वात उष्णतेच्या वेळी सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळावा. असं आवाहन करण्यात आले आहे.

व्हिसा न घेता ‘हज’ला गेलेल्या यात्रेकरूंना होतोय त्रास

दरवर्षी हजारो यात्रेकरू पैसे वाचवण्यासाठी हज यात्रेचा अधिकृत व्हिसा न घेता जात असतात. त्यामुळे त्यांना सौदीच्या प्रशासनाकडून योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. आणि त्याचा त्रास सहन करावा लागतो. या वर्षी सुमारे 18 लाख यात्रेकरू हज यात्रेमध्ये सहभागी झाले असून त्यापैकी 16 लाख यात्रेकरू परदेशी आहेत.

Source link

EgyptiansHajjHajj 2024Hajj 2024 PilgrimageHajj 2024 Yatrahajj newshajj pilgrimageHajj pilgrimshajj yatra 2024HeatJordanianMeccapilgrimsइजिप्शियनजॉर्डनियनमक्कायात्रेकरूसौदी अरेबियासौदी अरेबिया तापमानहजहज 2024हज 2024 तीर्थयात्राहज 2024 यात्राहज यात्राहज यात्रा बातम्याहज यात्रेकरूहीट
Comments (0)
Add Comment