UGC-NET परीक्षा रद्द, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; परीक्षेच्या पारदर्शकतेशी झाली तडजोड, CBIकडे दिला तपास

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून १८ जून २०२४ रोजी घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन अर्थात UGCला केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नॅशनल सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C)कडून परीक्षे संदर्भात काही गंभीर इनपुट मिळाले होते. त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

NTAकडून काल म्हणजे मंगळवारी UGC-NET परीक्षा देशातील विविध शहरांमध्ये दोन टप्प्यात घेण्यात आली होती.ही परीक्षा OMR मोडमध्ये झाली. मात्र I4C कडून दिलेल्या माहितीमध्ये या परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत तडजोड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच शिक्षण मंत्रालयाने परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता कायम राखण्यासाठी UGC-NET जून 2024 ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार UGC-NETची नव्याने परीक्षा घेतली जाईल. याबाबतची माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्याच बरोबर या प्रकरणाचा सखोल तपास सीबीआयकडे सोपवण्यात येत असल्याचे शिक्षण मंत्रालयाने सांगितले.

याआधी NEET परीक्षेच्या ग्रेस गुणांवरून झालेल्या गोंधळ पूर्णपणे मिटवण्यात आला आहे. तसेच पाटणा येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या अनियमिततेबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. संबंधित अहवाल मिळाल्यानंतर त्यावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

परीक्षांचे पावित्र्य आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कोणतीही तडजोड करणार नाही. या प्रकरणात कोणतीही संस्था अथवा व्यक्तीचा सहभाग असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे शिक्षण मंत्राल्याने स्पष्ट केले आहे.

Source link

CBIeducation ministrynational testing agencyugc netugc-net exam cancellationUGC-NET परीक्षा रद्दनॅशनल टेस्टिंग एजन्सीशिक्षण मंत्रालय
Comments (0)
Add Comment