(शैलेश चौधरी)
एरंडोल: रामदास जगताप राज्य समन्वयक यांनी अर्वाच्य भाषा वापरून राज्यातील तलाठी,मंडळाधिकारी आदींचा अपमान केला आहे म्हणून त्यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी एरंडोल तालुका तलाठी संघटनेतर्फे तहसिल कार्यालयासमोर ११ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बी.आर. पारधी,उपाध्यक्ष सलमान तडवी,सचिव सुरेश कट्यारे,एस.व्ही.मुंडे,सुवर्णा काळे,व्ही.सी.धाडसे,एस.एच.मोरे,एस.पी.शिरसाठ,एस.ए.शेख,एन.एस.शिंदे,यु.बी.निंबाळकर,ए.पी.सुर्वे आदी तलाठी सहभागी झाले.