व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या हाताचं बोट त्यांच्या हातात घेत काही तपासत असल्याचं दिसतंय. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या बोटावर मतदानानंतर लागलेली शाई चेक करत असल्याचं दिसत असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नालंदा यूनिव्हर्सिटीचे कुलपती अरविंद पनगढिया सभेला संबोधित करताना दिसत आहेत. स्टेजवर पंतप्रधान मोदी आणि नीतिश कुमार एकमेकांच्या आजूबाजूला बसलेले दिसत आहेत.
पंतप्रधानांच्या बोटावर काय पाहिलं?
यादरम्यान अचानक नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचा डावा हात पकडला. या त्यांच्या कृत्याने अनेकजण हैराण झाले. नितीश यांनी पंतप्रधान मोदींचा हात हातात घेतला. त्यानंतर मोदीही नितीश कुमार त्यांच्याकडे झुकले. नितीश कुमार यांनी पंतप्रधानांचं पहिलं बोट पकडलं आणि त्यांना आपलं स्वत:चं बोटही दाखवलं. त्यानंतर दोघंही हसले आणि पुन्हा खुर्चीवर सरळ होऊन बसले. या दोघांच्या व्हिडिओची सध्या एकच चर्चा आहे. दोघंही एकमेकांच्या बोटावरील मतदानानंतरची शाई तपासत असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोघांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची मोठी चर्चा आहे.
दरम्यान, नालंदा विद्यापिठाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितलं, नालंदाशी केवळ भारतच नाही, तर जगातील अनेक देशांचा वारसा जोडला गेला आहे. मी माझ्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांत नालंदामध्ये येण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे.