वैयक्तिक नावांनी हाक मारल्यावर प्रतिसाद देतात
हत्ती नावे पुकारताना आपल्या चित्कारण्यातील विविध आवाजांचा वापर करतात लांबवर असलेल्या कळपातील कोणालाही बोलावण्यासाठी विविध नावे वापरतात असं संशोधनात सांगण्यात आले आहे.
आपल्याला माहीत आहे की, माणसांना जसे नावे असतात तसेच पाळीव प्राण्यांना नावे देखील असतात आपण त्यांना हाक मारली ते लगेच धावत येतात. तसेच हत्ती देखील आपल्या सदस्यांना हाक मारत त्यांच्याशी संवाद साधतात असं संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
आवाज ओळखण्यासाठी मशीन लर्निंगचा केला वापर
नेचर इकोलॉजी आणि इव्होल्यूशनमधील अभ्यासासाठी, केनियाच्या सांबुरू नॅशनल रिझर्व्ह आणि अंबोसेली नॅशनल पार्कमध्ये रेकॉर्ड केलेल्या हत्तींच्या आवाजाच्या लायब्ररीमध्ये नावांचा वापर शोधण्यासाठी जीवशास्त्रज्ञांनी मशीन लर्निंगचा वापर केला आहे. संशोधकांनी जीपमध्ये हत्तींचा पाठलाग करून कोणी हाक मारली आणि कोणी प्रतिसाद दिला याचा शोध घेतला केवळ ऑडिओ डेटाचे विश्लेषण केले.
कॉर्नेल विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ मिकी पारडो यांनी अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की,“मानवांप्रमाणेच, हत्तीही नावे वापरतात, परंतु बहुसंख्य उच्चारांमध्ये कधी कधी जास्त नावे वापरत नाहीत, म्हणून आम्ही 100% अपेक्षा करणार नाही.”