Putin Visit In North Korea : व्लादिमीर पुतिन यांचा 24 वर्षांत प्रथमच उत्तर कोरिया दौरा, अमेरिकेने चिंता व्यक्त केली, दौऱ्यामागचं कारण काय ?

प्योंगयांग : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मंगळवारी (18 जून) 24 वर्षांत पहिल्यांदाच उत्तर कोरियाला भेट देणार आहेत. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन आणि पुतिन यांची भेट होणार असून ते दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. परंतु आता या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे.

2000 सालामध्ये झाली होती दोन्ही नेत्यांची भेट

या दोन्ही नेत्यांची शेवटची भेट सप्टेंबरमध्ये रशियाच्या वॉस्तोश्नी कॉस्मोड्रोम शहरात झाली होती, परंतु उत्तर कोरियाचा विचार केला तर 2000 सालानंतर पुतिन पहिल्यांदाच प्योंगयांगला भेट देणार आहेत.

सुरक्षा मुद्द्यांबाबत भेट असल्याची रशियाने दिली माहिती

रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पुतिन आणि किम यांची ही भेट सुरक्षा मुद्द्यांबाबत असणार आहे. यात दोन्ही देशांच्या भागीदारी करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. पुतिन यांच्या भेटीदरम्यान किम इल सुंग चौकात परेड होणार आहे. तसेच, पुतिन प्योंगयांगमधील एका संगीत कार्यक्रमाला भेट देतील. शिवाय उत्तर कोरियामधील एकमेव ऑर्थोडॉक्स चर्च, लाईफ-गिविंग ट्रिनिटीला भेट देणार आहेत.

पुतिन प्योंगयांगमधील कुमसुसान अतिथीगृहात मुक्काम करणार

2019 मध्ये चीनचे नेते शी जिनपिंग यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला होता. तेव्हा ते या ठिकाणी मुक्कामाला होते. तसेच या भेटीसाठी पुतिन त्यांचे नवीन संरक्षण मंत्री, आंद्रेई बेलोसोव्ह यांच्यासोबत असतील अशी माहीती आहे. तर परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक हे देखील शिष्टमंडळाचा भाग असणार आहेत.
Giorgia Meloni Net Worth: नमस्ते करून स्वागत करणाऱ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी; महिन्याचे उत्पन्न इतके लाख, एकूण संपत्ती…

युक्रेन- रशियन युद्धाला उत्तर कोरियाचा पाठिंबा

युक्रेन- रशियन युद्धाला उत्तर कोरियाने पाठिंबा दिला आहे.त्यामुळे पुतिन यांनी उत्तर कोरियाचे कौतुक केले आहे. किम यांनी गेल्या आठवड्यात असं म्हटलं होतं की, ”त्यांचे रशियाबरोबरचे संबंध “कॉम्रेड-इन-आर्म्सच्या अतूट नातेसंबंधात विकसित झाले आहेत.”

तर गेल्या वर्षी या दोन्ही नेत्यांच्या भेटीदरम्यान पुतिन म्हणाले होते की, ”त्यांनी उत्तर कोरियाशी लष्करी सहकार्यासाठी शक्यता पाहिली आहे. यावर किम यांनी रशियाच्या अध्यक्षांना युक्रेनमध्ये ‘विजय’ मिळावा अशा शुभेच्छा दिल्या होत्या.

पुतीन -किम यांच्या भेटीने अमेरिका चिंतेत

अमेरिकेच्या व्हाईट हाऊस कार्यालयाने पुतीन -किम यांच्या भेटीमुळे अमेरिका चिंतेत आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, “आम्हाला पुतिन यांच्या दौऱ्याबद्दल कसलीही चिंता वाटत नाही. आम्हाला या दोन देशांमधील घट्ट होत जाणाऱ्या संबंधांची चिंता आहे.”

2000 मध्ये पुतिन यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीच्या सुरूवातीलाच त्यांनी किमचे वडील, किम जोंग इल यांची भेट घेतली होती. आता रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून या दोन्ही देशांमधील संबंध वाढले आहेत.

उत्तर कोरियाने रशियाला दारूगोळा आणि इतर शस्त्रास्त्र पुरवल्याचा आरोप अमेरिका आणि दक्षिण कोरियाने केला होता. अन्न, लष्करी मदत आणि तंत्रज्ञानाच्या बदल्यात ही मदत करण्यात आली होती. मात्र उत्तर कोरिया आणि रशिया या दोघांनीही अशा मदतीचे दावे नाकारले आहेत.

Source link

north koreanorth korea newsputinputin newsrussia ukraine newsrussia ukraine warकिम जोंगकिम जोंग उनपुतीन विरुद्ध बायडन
Comments (0)
Add Comment