महाराष्ट्राच्या काही भागांसह छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, बिहार, झारखंडसह बंगालच्या उपसागरातील वायव्य भाग या परिसरामध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
देशात एक जूनपासून वायव्य भारतामध्ये १०.२ मिलिमीटर (सरासरीपेक्षा ७० टक्के कमी) पाऊस झाला आहे. मध्य भारतात ५०.५ मिमी (सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी), दक्षिण भागात १०६.६ मिमी (सरासरीपेक्षा १६ टक्के कमी) आणि पूर्व व ईशान्य भारतात १४६.७ मिमी (सरासरीपेक्षा १५ टक्के कमी) पाऊस झाला आहे.
८०.६ मिलिमीटर
१ ते १८ जून या काळात देशात पडणारा सरासरी पाऊस
६४.५ मिमी
या वर्षी १ ते १८ जून या काळात पडलेला पाऊस
मान्सूनची वाटचाल
– मान्सून १९ मे रोजी निकोबार बेटांवर पोहोचला आणि २६ मेपर्यंत बंगालच्या उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग मान्सूनने व्यापला होता.
– मान्सून केरळमध्ये दोन दिवस आधी म्हणजे ३० मे रोजी, तर ईशान्य भारतात त्याच दिवशी (सहा दिवस आधी) पोहोचला.
– केरळमध्ये पोहोचल्यानंतर मान्सूनची प्रगती सुरू झाली आणि १२ जूनपर्यंत केरळ, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगण, दक्षिण महाराष्ट्राचा बहुतांश भाग, छत्तीसगडचा दक्षिण भाग आणि ओडिसाच्या दक्षिण भाग मान्सूनने व्यापला.
– पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येतील सर्व राज्यांमध्येही याच काळात मान्सून पोहोचला.
– त्यानंतर मान्सूनने प्रगती केली नसून, १८ जूनपर्यंत मान्सूनच्या उत्तर सीमा नवसारी, जळगाव, अमरावती, चंद्रपूर, विजापूर, सुकमा, मलकानगिरीपर्यंत पोहोचल्या आहेत.
२५ उपविभागांमध्ये पावसाचा तुटवडा
– हवामान विभागाच्या ११ उपविभागांमध्ये एक ते १८ जून या काळात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
– २५ उपविभागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
– दक्षिण भारत आणि ईशान्येतील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. वायव्य आणि मध्य भारतामध्ये सरासरीएवढा पाऊस होईल, असे अंदाजात म्हटले आहे.