बेटी पढाओ, बेटी बचाओ! मोदींंची घोषणा त्यांच्याच मंत्र्यांना लिहिता येईना; भलताच घोळ घातला

भोपाळ: मध्य प्रदेशच्या एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणाच नीट लिहिता आली नाही. केंद्रीय मंत्र्यांना चार शब्दांची घोषणादेखील अचूक लिहिता न आल्याचा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं यावरुन मंत्र्यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

धार जिल्ह्यातील ब्रह्मा कुंडीस्थित सरकारी शाळेत १८ जूनला ‘स्कूल चलो अभियाना’च्या अंतर्गत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून धार लोकसभेच्या खासदार सावित्री ठाकूर यांना बोलावण्यात आलं होतं. त्या मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास खात्याच्या राज्यमंत्री आहेत.
पवारांच्या पत्रानं ‘अच्छे दिन’, बाजारात हिरवळ; गुंतवणूकदारांच्या तोंडात साखर, कोटींची कमाई
व्हिडीओमध्ये सावित्री ठाकूर पांढऱ्या फळ्यावर देवनागरीत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची घोषणा चुकीच्या पद्धतीनं लिहिताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. के मिश्रा यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींना आणि मोठ्या विभागांची जबाबदारी असणाऱ्या व्यक्तींना त्यांचीच मातृभाषा येत नाही. ही माणसं त्यांचं मंत्रालय कसं चालवू शकतात?,’ असा सवाल मिश्रांनी उपस्थित केला.

धारचे भाजप जिल्हाध्यक्ष मनोज सोमानी यांनी सावित्री ठाकूर यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न सारवासारव केली. ‘स्कूल चलो अभियानादरम्यान झालेल्या घाईगडबडीत महिला मंत्र्यांकडून चूक झाली. या व्हिडीओवरुन काँग्रेसनं केलेल्या टिकेतून त्यांचे आदिवासीविरोधी विचार दिसतात. सावित्री यांच्या भावना आणि संवेदना पवित्र आहेत. पण काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या भावना पवित्र राखता येत नाहीत. आदिवासी महिलेचा अपमान आदिवासी समाज खपवून घेणार नाही. आदिवासी समाज त्यांना माफ करणार नाही. आदिवासी महिलेची आगेकूच काँग्रेसला बघवत नाहीए,’ अशा शब्दांत सोमानींनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.

Source link

beti padhao beti bachaobjpCongressPM Modiunion ministerकेंद्रीय मंत्रीपंतप्रधान मोदीबेटी पढाओ बेटी बचाओभाजप
Comments (0)
Add Comment