बिहार सरकारने दिलेले ६५ टक्के आरक्षण हायकोर्टाकडून रद्द, महाराष्ट्रात काय होणार?

मुंबई : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग अशा विविध प्रवर्गांना ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून सरकारी नोकरीत दिलेले ६५ टक्के आरक्षण पाटना उच्च न्यायालयाने रद्द करून बिहारच्या नितीश कुमार सरकारला मोठा दणका दिला. मुख्य न्यायमुर्ती के व्ही चंद्रन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने गौरव कुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या याचिकांवर निर्णय दिला. या निर्णयाचे परिणाम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर उमटणार आहेत.
कारण लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचा इम्पॅक्ट दाखवणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाला बसलेले असताना, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर डोकेदुखी वाढू नये तसेच लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही मराठा मते विरोधात जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारवर सगेसोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीचा दबाव आहे. जर जरांगेंच्या मागणीनुसार अंमलबजावणी करावी तर न्यायालयीन स्तरावर ते टिकणार नाही आणि जरांगेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करावे तर विधानसभेत मराठा मतांचा मोठा फटका बसेल, पर्यायाने लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्येही महायुतीची पिछेहाट होईल, असे बोलले जात आहे. त्यामुळे विधिमंडळात कायदा करून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्याने त्यांची मते आपल्यालाच मिळतील, या महायुतीच्या मनसुब्यांवर पाणी पडण्याची शक्यता आहे. समावेश केला तर ओबीसी नाराज, नाही केला तर मराठ्यांचा रोष, विधानसभेआधी महायुती अडचणीत, जरांगेंनी कात्रीत पकडले!दुसरीकडे अपवादात्मक परिस्थिती वगळता घटनेने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ५० टक्कांच्यावरती आरक्षण टिकणार नाही, यावरती पटना उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने तांत्रिक गोष्ट मराठा समाजाला पर्यायाने मनोज जरांगे यांना सांगून कात्रीत अडकलेली मान सोडविण्याचा प्रयत्न सरकार करू शकते, असेही बोलले जात आहे.
मी स्वत: निवडणूक लढविणार नाही, विधानसभेसाठी आमचा १२७ जागांवर पहिला सर्व्हे पूर्ण : मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे यांच्या मुख्य मागण्या काय आहेत?

मराठा समाजाला न्यायालयात टिकणाऱ्या आरक्षणासाठीच्या या आंदोलनातील इतर मागण्यांमध्ये सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर मराठा कुणबी एकच आहेत, हा कायदा पारीत करण्याची त्यांची मागणी आहे.
माझा जन्म राजघराण्यात झाला असता तर अशी वेळ आली नसती : पंकजा मुंडे

पाटना उच्च न्यायालयाचा बिहार सरकारला दणका!

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी १० टक्के आरक्षण रद्द करणे हे घटनेच्या कलम १४ आणि १५ (६) (ब) चे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे वकील दिनू कुमार केला होता. आरक्षणाचा हा निर्णय सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेशा प्रतिनिधित्वाच्या आधारावर नसून जात सर्वेक्षणानंतर जातींच्या प्रमाणाच्या आधारावर घेण्यात आला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

इंदिरा सहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या मर्यादेवर ५० टक्के निर्बंध घातले होते. जात सर्वेक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे, ज्यामध्ये ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत आरक्षण वाढविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. या निर्णयानंतर बिहार सरकारला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग अशा विविध प्रवर्गांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत नव्याने विचार करावा लागणार आहे.

Source link

bihar patna courtbihar reservationbihar reservation NewsManoj Jarange Agitationmanoj jarange patil agitationMaratha Reservationnitish kumarnitish kumar govtnitish kumar newsPatna High CourtPatna High Court on 65 Percent Reservationनीतीश कुमारबिहार आरक्षणबिहार आरक्षण पटना उच्च न्यायालयमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षण
Comments (0)
Add Comment