किंमत आणि उपलब्धता
हे उत्पादन नुकतेच Fuji ने जाहीर केले आहे आणि तुम्ही ते 23 जूनपासून खरेदी करू शकता. हे उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला 18,999 रुपये खर्च करावे लागतील. नवीन लॉन्च सोबत, Instax Mini LiPlay चे नवीन रंग देखील दिसतील. हा कॅमेरा मॅचा ग्रीन, मिस्टी व्हाईट आणि डीप ब्रॉन्झ या रंगांमध्ये उपलब्ध आहे. नवीन रंग 19 जुलैपासून बाजारात उपलब्ध होतील.
मोठ्या ग्रुपचे फोटो सहज शक्य
यापूर्वी Fujifilm ने Instax Wide 300, लॉन्च केले होते. आता त्याचे पुढील मॉडेल Instax Wide 400TM लाँच करण्यात आले आहे. याआधीचा कॅमेरा कंपनीने 2014 मध्ये लॉन्च केला होता. हा डबल कार्ड साइज वाइड फॉरमॅट फिल्म कॅमेरा आहे. त्याच्या मदतीने युजर्स मोठ्या ग्रुपचे फोटो सहज काढू शकतील. यासह लँडस्केप आणि कंपोजिशन कॅप्चर करणे देखील सोपे होईल.
Instax Mini 99 देखील लाँच
INSTAX MINI 99 झटपट कॅमेरा देखील लाँच करण्यात आला. त्याची MRP 20,999/- आहे. हे उत्पादन ४ एप्रिलपासून www.Instax.in आणि Amazon, Flipkart सारख्या विविध ऑनलाइन रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे. याशिवाय आमची देशभरात 2000 हून अधिक स्टोअर्स आहेत. या कॅमेऱ्याची चित्र गुणवत्ता खूप चांगली आहे आणि लोक याचा डिजिटल कॅमेरा म्हणून वापर करतात.
अशी घ्या तुमच्या कॅमेराची काळजी
कॅमेरा मग तो कुठल्याही कंपनीचा असो त्याची नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. कॅमेराची नियमित काळजी घेण्याच्या दृष्टीने काही टिप्स देत आहोत.
- तुमचा कॅमेरा आणि लेन्स नियमितपणे साफ करा सफाईसाठी ब्लोअर ब्रश किंवा एअर ब्लोअर वापरून सुरुवात करा. कोणतेही डाग किंवा फिंगरप्रिंट्स हळूवारपणे पुसण्यासाठी मायक्रोफायबर कापड आणि कॅमेरा लेन्ससाठी डिझाइन केलेले क्लिनिंग सोल्यूशन वापरा.
- वापरात नसताना तुमचा कॅमेरा आणि लेन्स नेहमी झाकून ठेवा. धूळ कॅमेरा बॉडीमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी लेन्स कॅप्स आणि बॉडी कॅप्स वापरा.
- तुमचा कॅमेरा नेहमी थेट सूर्यप्रकाश आणि अति तापमानापासून दूर ठेवा.आपल्या कॅमेरा बॅगमध्ये ओलावा-शोषक सिलिका जेल पॅकेट वापरण्याचा विचार करा.
- कॅमेराला एखादेवेळी प्रोफेशनल सर्व्हिसिंगची आवश्यकता असते. नियमित सर्व्हिसिंगमुळे संभाव्य समस्या वाढण्याआधी लक्षात येतील व तुमचा कॅमेरा कंडिशन मध्ये राहील.