Hariyana Kaithal Murder Case : लग्न झालेल्या बहिणीच्या घरी पोहोचला भाऊ; मग घडला मराठी चित्रपटात दाखवलेला थरार

कैथल: 2016 साली नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने जगभरात धुमाकूळ घातला होता. त्याच कारण होतं चित्रपटाची स्टोरी. परश्या अन् आर्चीने विवाह केला परंतु आर्चीच्या भावानं त्या दोघांची हत्या केली. या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. परंतु दिवसेंदिवस अश्या घटना घडतच आहे. अशातच बुधवारी (19 जून ) हरियाणा राज्यात ‘सैराट’ चित्रपटाची प्रत्यक्षात पुनवरावृत्ती झाली आहे.

हरियाणातील कैथलमध्ये बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. भावाने बहिणीच्या सासरी जाऊन तिच्यावर गोळी झाडत हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं. दरम्यान, या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालं आहे.

नेमकं काय घडलं ?

कैथल शहराच्या नानकपुरी कॉलनीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीने तिच्या शेजारी राहणाऱ्या मुलाशी आंतरजातीय विवाह केला. या विवाहावर मुलीचे कुटुंबीय नाराज होते. बुधवारी आरोपी भाऊ त्याच्या बहिणीला भेटायला तिच्या सासरी आला. दोघांमध्ये तासभर चर्चाही झाली. आरोपी बहिणीचा चहा सुद्धा प्यायला मात्र, चहा संपताच त्याने बहीणीवर गोळीबार करत हत्या केली.

तरुणीची सासू आणि वहिनी गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भावाने बहिणीच्या सासरच्या घरात घुसून गोळीबार केला. गोळी लागल्याने त्याच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. तर तिची सासू आणि वहिनी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आंतरजातीय विवाह केल्याच्या राग

हत्या झालेल्या मुलीच्या सासरच्या लोकांनी या बाबतची अधिक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ”फेब्रुवारीमध्ये त्यांच्या मुलाचे लग्न झाले. तेव्हापासून सुनेच्या घरच्यांकडून सातत्याने धमक्या येत होत्या. बहिणीने अनुसूचित जाती समाजातील मुलाशी लग्न केल्याचा राग आरोपीला होता.”

हत्येचा व्हिडिओ काढला

आरोपीने या हत्याकांडाचा व्हिडिओ देखील काढला असून ज्यामध्ये तो पिस्तूल फिरवताना दिसत आहे. नंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली देत पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Source link

hariyanahariyana crimehariyana crime newshariyana kaithal newshariyana newsहरियाणाहरियाणा न्यूजहरियाणा बातमी
Comments (0)
Add Comment