Arvind Kejriwal Grants Bail: ईडीच्या विरोधानंतरही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला. राऊज एव्हेन्यू कोर्टाने एक लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. ईडीने केजरीवालांच्या जामीनाविरोध करण्यासाठी ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र कोर्टने ईडीचा युक्तीवाद उद्या शुक्रवारी बोर्डावरील न्यायाधिशांसमोर करू शकता.

याआधी केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मिळाला होता. त्यानंतर ते पुन्हा तुरुंगात हजर झाले होते. आजच्या कोर्टाच्या निर्णयानंतर आता केजरीवाल तिहार जेलमधून उद्या म्हणजेच शुक्रवारी २१ जून रोजी बाहेर येऊ शकतील.

ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी केले आहे. केजरीवाल यांना प्रथम अटक केल्यानंतर मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मिळाला होता. पण तेव्हा कोर्टाने निवडणूक झाल्यानंतर पुन्हा शरण येण्यास सांगितले होते. आता मात्र मुख्यमंत्री यांना नियमीत जामीन मिळाला असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या या निर्णयाचा आम आदमी पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Source link

arvind kejriwalarvind kejriwal alleged excise scamarvind kejriwal money laundering casedelhi court grants bail to arvind kejriwalअरविंद केजरीवालअरविंद केजरीवाल यांना जामीनदिल्लीचे मुख्यमंत्री
Comments (0)
Add Comment