WhatsApp हा एक लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे ज्याचा वापर जगभरातील लाखो लोक करतात. या अॅपमध्ये प्रत्येक युजर आपला प्रोफाइल फोटो लावतो, पण तुम्हाला प्रत्येकाला तो दिसणार नाही असे वाटत असेल तर हा फोटो लपवण्याचा ऑप्शन कंपनी देते. तुम्हाला देखील ही सेटिंग करायची असेल तर यासाठी तुम्हाला खालील सोपे स्टेप्स फॉलो करावे लागतील.
WhatsApp वर प्रोफाइल फोटो कसा लपवायचा
- सर्वात आधी, तुमच्या फोनवर WhatsApp अॅप ओपन करा.
- अॅपच्या खालच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा. नंतर Settings पर्याय निवडा.
- सेटिंग्स मेन्यूमध्ये Account पर्यायावर टॅप करा.
- अकाउंट सेटिंग्समध्ये Privacy पर्याय निवडा.
- प्रायव्हसी सेटिंग्समध्ये Profile Photo पर्यायावर टॅप करा.
तुम्हाला हवा तो पर्याय निवडा
येथे तुम्ही निवडू शकता की कोण तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकतो. तुम्हाला यासाठी तीन पर्याय मिळतात:
- Everyone: हा डिफॉल्ट पर्याय आहे आणि याचा अर्थ कोणतीही व्यक्ती तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकते, ती व्यक्ती तुमच्या संपर्क काँटॅक्ट लिस्टचा भाग असो वा नसो.
- My Contacts: जर तुम्ही हा पर्याय निवडला, तर फक्त तुमचे काँटॅक्ट तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकतील.
- No one: या पर्यायावर टॅप केल्यास कोणताही व्यक्ती तुमचा प्रोफाइल फोटो पाहू शकणार नाही.
तुमची निवड फिक्स करा
जर तुम्हाला अनोळखी लोकांनी तुमचा फोटो पाहू नये असे वाटत असेल, तर दुसरा किंवा तिसरा पर्याय निवडा. त्यानंतर Done बटणावर टॅप करा. My Contacts पर्याय निवडल्यानंतर तुम्ही निवडक काँटॅक्टपासून तुमचा प्रोफाइल फोटो लपवू शकता किंवा फक्त निवडक लोकांना प्रोफाइल फोटो दाखवू शकता. प्रोफाइल फोटो बदलताना तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्समध्ये आवश्यक बदल करावे लागतील.
प्रोफाईल फोटो इतरांच्या नजरांपासून लपवणे का आवश्यक
WhatsApp प्रोफाइल तुमच्या काँटॅक्टशिवाय इतरांपासून प्रोफाईल फोटो लपवणे आवश्यक आहे कारण यामुळे तुमची प्रायव्हसी आणि सुरक्षा राखण्यास मदत होते. तुमचा फोटो सार्वजनिक ठेवल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते, अनोळखी लोक त्रास देऊ शकतात आणि स्पॅम मेसेजेस येऊ शकतात.