अजित डोवाल यांनी केली चर्चा
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी त्यांचे अमेरिकन समकक्ष जेक सुलिव्हन यांच्याशी या विषयावर चर्चा केली. डोवाल म्हणाले की, ”भारत आणि अमेरिकेने त्यांच्या मोठ्या धोरणात्मक हिताचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या विकासात आघाडीवर असले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, प्रगत दूरसंचार आणि संरक्षण क्षेत्रातील भारत-अमेरिकेतील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे.”उदयोन्मुख तंत्रज्ञानावर दोन्ही देशांचा पुढाकार
नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, “माझ्या गेल्या वर्षीच्या भारत भेटीनंतर, नासा मानवतेच्या फायद्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाबाबत अमेरिका आणि भारत पुढाकार घेत आहेत. आम्ही एकत्रितपणे आमच्या देशांचे अंतराळातील सहकार्य वाढवू, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर इस्रोच्या अंतराळवीरांसोबत संयुक्तरित्या काम करू. भारत व अमेरिका हे दोन्ही देश भविष्यातील मानवी अंतराळ उड्डाणांना समर्थन देतील आणि पृथ्वीवरील जीवन सुधारतील.”
गगनयान मिशन काय आहे ?
गगनयान या मिशनवर इस्रोचे काम दीर्घकाळापासून सुरू आहे. गगनयानचे लक्ष्य पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर पोहोचण्याचे आहे. 2024 पर्यंत 5 ते 7 दिवसांसाठी तीन सदस्यीय क्रू अवकाशात पाठवणे हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड करण्याचे काम भारतीय हवाई दलाला देण्यात आले होते. चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 मोहिमेनंतर इस्रोची ही गगनयान मोहीम भारतासाठी खास असणार आहे.