sameer wankhede: ‘कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहे’; आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडेंचा मोठा आरोप

हायलाइट्स:

  • एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार.
  • आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा वानखेडे यांचा दावा.
  • पाळत ठेवणाऱ्यांमध्ये मुंबई पोलिसांतील अधिकाऱ्याचा समावेश- वानखेडे.

मुंबई: क्रूझवरील ड्रग पार्टीवर (Drug Party) छापा मारणारे अमली पदार्थ विरोधी विभागाचे (एनसीबी NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer wankhede) चर्चेत आले आहेत. या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर वानखेडे प्रकाशझोतात आले आहेत. मात्र, आता ते वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. ड्रग पार्टी प्रकरणाचा खटला कोर्टात सुरू असताना आता वानखेडे यांनी स्वत: मुंबई पोलिसांकडे एक तक्रार केली आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, अशी वानखेडे यांची तक्रार आहे. यासाठी वानखेडे यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांचीही (DGP) भेट घेतली. (ncb zonal director sameer wankhede has lodged a complaint with mumbai police alleging that some police personnel are keeping watch on me)

मुंबईतील समुद्रात एका क्रूझवरील ड्रग पार्टीवर मोठी कारवाई करत एनसीबीने काही लोकांना अटक केली. यात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत मुंबई पोलिसही सक्रिय झाले आहेत. आपल्यावर पाळत ठेवण्याबाबतची तक्रार करत असताना वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना पाळत ठेवली जात असल्यासंदर्भात काही पुरावे देखील सादर केले आहेत. तसेच या तक्रारीशी संबंधित काही सीसीटीव्ही फूटेजही मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘बंद में कभी कभी ऐसा हो जाता है’; संजय राऊत यांची ‘महाराष्ट्र बंद’बाबत प्रतिक्रिया

वानखेडेंवर कशासाठी ठेवली जात आहे पाळत?

अमली पदार्थ विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर कशासाठी पाळत ठेवली जाते हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ज्या ठिकाणी वानखेडे यांच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या स्मशानभूमीत आईच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना दोन संशयीत व्यक्ती आपला पाठलाग करत असल्याचे वानखेडेंना लक्षात आले. ज्या स्मशानभूमीत वानखेडे यांच्या आईवर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी वानखेडे वरचेवर जात असतात.

क्लिक करा आणि वाचा- राज्याला आज मोठाच दिलासा! करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दीड वर्षानंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घट

दोन व्यक्ती आपला पाठलाग करत आहेत याचा संशय त्यांना काल सोमवारी ११ ऑक्टोबरला आला. त्यानंतर त्यांन आपला पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फूटेजही मिळवले. त्यानंतर या सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. पाठलाग करणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती मुंबई पोलिस दलात एका महत्वाच्या पदावर कार्यरत असल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- प्रवीण दरेकरांचा मलिकांवर हल्लाबोल; जावयाचे ड्रगप्रकरण काढत म्हणाले…

वानखेडे यांच्या या दाव्यामुळे या ड्रग प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस सखोल चौकशी करतील अशी अपेक्षा समीर वानखेडे यांना आहे.

Source link

complaint by sameer wankhededrug partyNawab MalikNCBsameer wankhedeएनसीबीनवाब मलिकसमीर वानखेडे
Comments (0)
Add Comment