नातेवाईकांनी सल्ला दिला म्हणून यूपीएससीच्या अभ्यासाला सुरवात
आकृती सेठी असं परीक्षा पास करणाऱ्या तरुणीचे नाव असून त्या हरियाणातील अंबाला येथे राहतात. आकृती या लहानपणापासून खूप अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि एका खासगी कंपनीत नोकरी करू लागल्या. परंतु नातेवाईकांनी त्यांना यूपीएससीची परीक्षा देण्याचा सल्ला दिला. हा सल्ला ऐकल्यावर आकृती यांच्या मनामध्ये यूपीएससीची परीक्षा सोपी नाही, मला ते जमेल का? खूप सारा अभ्यास करावा लागेल, मी परीक्षा पास झाले नाही तर? माझी नोकरी गमावून बसले.असे प्रश्न निर्माण होऊ लागले होते.
बहिणीच्या लग्नानंतर नोकरी सोडली
बहिणीच्या लग्नानंतर आकृती यांनी अखेर यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि 2017 साली त्यांनी यूपीएससीची प्रिलिम्स परीक्षा दिली. परंतु त्यामध्ये आकृती नापास झाल्या. त्यानंतर आपण नोकरी सोडून चूक केली की काय? असं त्यांना वाटू लागले.
सलग 5 वर्षे आलं अपयश
आकृती यांना एकापाठोपाठ 5 वर्षे अपयश आले. त्या प्रचंड निराश झाल्या परंतु अशावेळी त्यांच्या वडिलांनी धीर दिला. आकृती यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम त्यांचे वडील करायचे. ”तुझं मन बरोबर ठेव, तुझं मन बरोबर असेल तर सगळं ठीक होईल.” असं वडील म्हणायचे. आणि याच हिंमतीच्या आधारे आकृती यांनी 6 वा अटेम्प्ट देण्यासाठी तयारी सुरू केली.
सहाव्या प्रयत्नात मिळालं यश
वडिलांनी हिम्मत दिल्यावर आकृती यांनी प्रचंड मेहनतीने अभ्यास सुरू ठेवला. आणि २०२२ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. आकृती यांनी परीक्षेत २४९ वा क्रमांक पटकावला. परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.
मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवला
आकृती सेठी यांनी आपल्या यशबद्दल भावना व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, कोणतंही काम करताना फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. मग तुम्ही ते नक्की साध्य करू शकता.” दरम्यान, आकृती शेठी यांचा हा संघर्षमय प्रवास तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.