संदीप कुमार यांना 20.54 लाख रुपयांना गंडविण्यात आले आहे. संदीप यांना वर्क फ्रॉम होम जॉबसाठी एक मेसेज आला होता ज्यामध्ये म्हटले होते की तुम्ही घरबसल्या काम करून चांगले पैसे कमवू शकता. काम म्हणून त्यांना गूगल मॅप्सवर हॉटेलचा रिव्यू द्यायचा होता.
संदीप यांनी आधी गुंतवले 50 हजार रुपये
FIR नुसार, संदीप यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला होता ज्यामध्ये वर्क फ्रॉम होमसाठी म्हटले होते. व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजचा रिप्लाय केल्यानंतर संदीप कुमार यांना टेलीग्राम ग्रुपचा एक लिंक मिळाला ज्यामध्ये आधीच 100 मेंबर्स होते. ग्रुप जॉइन केल्यानंतर सुरुवातीला संदीप यांना गूगल मॅप्सवर हॉटेलच्या रिव्यूजसाठी पैसे मिळाले, पण नंतर त्यांना अधिक कमाईसाठी पैसे गुंतवावे लागतील असे सांगण्यात आले. हे प्रीपेड टास्क असतील असे सांगण्यात आले. संदीप यांनी सुरुवातीला 50 हजार रुपये गुंतवले आणि पैसे आपल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पैसे काढता आले नाहीत. संदीप यांना सांगण्यात आले की त्यांना आणखी 5 लाख रुपये जमा करावे लागतील. अशा प्रकारे अनेक वेळा संदीप यांनी एकूण 20,54,464 रुपये गुंतवले. पण नंतर त्यांना ते पैसे परत मिळाले नाहीत.
स्कॅमर्सनी दिली जीवे मारण्याची धमकी
संदीप यांनी पोलिसांना सांगितले की स्कॅमर्सनी त्यांना मारण्याची धमकी दिली आहे. स्कॅमर्सनी सांगितले की त्यांच्या जवळ संदीप यांच्या घराच्या पत्त्यासह आधार कार्ड, पॅन कार्ड इतर माहिती आहे. संदीप यांना टेलीग्राम, फोन कॉल आणि व्हॉट्सअॅपवर सतत धमक्या मिळत आहेत.
महाराष्ट्र टाइम्स आपल्या सर्व वाचकांना आवाहन करते की अशा प्रकारच्या मेसेजेसपासून दूर राहा. जर तुम्हाला अशा प्रकारच्या जॉबचा कोणतीही ऑफर मिळाली तर ताबडतोब नंबर ब्लॉक करा. कोणत्याही परिस्थितीत पैसे गुंतवण्याची चूक करू नका.